Home /News /nagpur /

Nagpur: रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाची डॉक्टरांना मारहाण, रुग्णालयात तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद

Nagpur: रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाची डॉक्टरांना मारहाण, रुग्णालयात तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद

तरुणाचा मृत्यू झाल्याने जमावाची रुग्णालयात तोडफोड, डॉक्टरांना मारहाण; नागपुरातील घटनेचा LIVE VIDEO

तरुणाचा मृत्यू झाल्याने जमावाची रुग्णालयात तोडफोड, डॉक्टरांना मारहाण; नागपुरातील घटनेचा LIVE VIDEO

नागपूर येथे रुग्णालयात तोडफोड करुन डॉक्टरांवरही हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णाच्या मृत्यू नंतर संतप्त जमावाने हे कृत्य केलं आहे. (angry crowd vandalised hospital after patient died in Nagpur)

नागपूर, 28 जानेवारी : रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात आल्याच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. आता असाच प्रकार नागपुरातून (Nagpur) समोर आला आहे. नागपूर येथील मानकापूर परिसरात असलेल्या कृणाल रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णाच्या मृत्यू नंतर संतप्त झालेल्या जमावाने डॉक्टरांवर हल्ला केला आणि त्यानंतर रुग्णालयात धुडगूस घालत तोडफोड केली. (Angry mob attack on doctors and vandalised hospital in Nagpur) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील कृणाल रुग्णालयात एका तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतकाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला केला. त्यानंतर रुग्णालयात धुडगूस घालत जोरदार तोडफोड करण्यास सुरुवात केली. रुग्णालयात घडलेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद (incident caught in CCTV) झाला आहे. धक्कादायक म्हणजे ज्यावेळी हा जमाव रुग्णालयात तोडफोड करत होता त्यावेळी शेजारीच रुग्णावर उपचार सुद्धा सुरू असल्याचं दिसून येत आहे. रुग्णालयातील बेडवर वयोवृद्ध रुग्णावर उपचार सुरू होते आणि त्याच्याच शेजारी हा जमावर तोडफोड करत असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. वाचा : 2 कोटींसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, बेदम मारहाण करून गाडीतून फेकून दिले या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आपला तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. आजीचा मृत्यू झाल्याने संतप्त नातवाची रुग्णालयात तोडफोड सप्टेंबर महिन्यात पुण्यात असाच एक प्रकार घडल्याचं समोर आलं होतं. उपचार घेत असताना एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना शिवीगाळ केली. कर्मचाऱ्यांना मारहाण करत हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. ही घटना देहूच्या युनिकेअर हॉस्पिटलमध्ये घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. आरोपी तुषार याची आजी बेशुद्ध पडल्याने बेशुद्ध अवस्थेत त्यांना युनिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते. उपचार सुरू असताना तुषारच्या आजीचा मृत्यू झाला. याबाबत फिर्यादी डॉ. सुहास जोशी यांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर तुषार याने हंबरडा फोडून हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. मोठमोठ्याने आरडा ओरड करून हॉस्पिटलची शांतता भंग करून, ड्युटीवर उपस्थित डॉ. संदीप पवार आणि डॉ. आनंद दुगड यांना शिवीगाळ करून अंगावर धावून गेला. यावर न थांबता मयत आजीच्या नातवाने हॉस्पिटलच्या काचेचा दरवाज्यावर जोराची लाथ मारली. बीपी मोजण्याचे मशीन फेकून त्याचे नुकसान केले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cctv, Crime, Nagpur

पुढील बातम्या