Home /News /nagpur /

Nagpur Crime News: 2000 रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या, धारदार चाकूने पाठीवर केले सपासप वार

Nagpur Crime News: 2000 रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या, धारदार चाकूने पाठीवर केले सपासप वार

नागपुरात 2000 रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा घात, पाठीवर सपासप वार करुन दिला भयंकर मृत्यू

नागपुरात 2000 रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा घात, पाठीवर सपासप वार करुन दिला भयंकर मृत्यू

Nagpur Crime News: नागपुरात मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिघोरी घाटाजवळ ही घटना घडली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

नागपूर, 18 जानेवारी : मित्रानेच मित्राची हत्या (murder) केल्याची घटना नागपुरातून (Nagpur) समोर आली आहे. नागपुरातील दिघोरी घाट (Dighori Ghat) परिसरात ही घटना घडली आहे. दोन मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर एका मित्राने दुसऱ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार (stabbed with sharp knife) केले. या हल्ल्यात 19 वर्षीय रोशन पुरी (Roshan Puri) याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घनटेने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोशन पुरी आणि त्याचा मित्र अनमोल सुखराम मेश्राम यांच्यात वाद झाला होता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोघेही दारू पित होते त्यावेळी दोघांत वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. अनमोल मेश्राम याने रोशन पुरी याच्यावर चाकूने वार करत हत्या केली आहे. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी एका मित्राला अटक केली आहे. तर अनमोल याचा मित्र फरार आहे. 2000 रुपयांसाठी हत्या? मिळालेल्या माहितीनुसार अनमोल हा कार वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो तर रोशन कॅटरिंग सर्व्हिस सेंटरमध्ये काम करत होता. अनेकदा दोघेही एकाच ठिकाणी ऑर्डरवर जात असत. दोन वर्षांपूर्वी अनमोल याने रोसन याच्याकडून 2000 रुपये उधार घेतले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही अनमोल याने पैसे परत केले नाहीत. रोशन त्याच्याकडून वारंवार पैसे मागत होता यावरुन दोघांत वादही झाला होता. वाचा : सोबत मरताही नाही आलं, नियतीनं केलं कायमचं वेगळं, बीडमधील कपलसोबत घडलं आक्रीत सोमवारी रात्रीच्या सुमारास अनमोल त्याचा मित्र चेतन आणि रोशन हे एकमेकांना भेटले. दिघोरी घाटाजवळ योगेश्वरनगर येथे रोशन याला ते घेऊन गेले. यानंतर त्यांनी धारदार शस्त्राने रोशनवर सपासप वार केले. या हल्ल्यात रोशन याचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्रे हलवली आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले तर अद्यापही एक जण फरार आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी एक टीम बनवली आहे. वाचा : मासे आणि चिप्स विक्रेत्यांना पोलिसांकडून Alert, घडतायत विचित्र गुन्हे मकरसंक्रातीला घरातून निघालेले जिगरी दोस्त; एकाचा मृतदेह आढळला तर दुसरा... वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील दोन मित्र मकरसंक्रातीच्या (Makar Sankranti) दिवशी आपल्या घरातून बाहेर पडले होते. हे दोघे 14 जानेवारी च्या सायंकाळ पासून बेपत्ता होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. रविवारी सकाळी गोरे याच्या शेतातील विहिरीत मुरलीधर उर्फ चेतन मुंदडा याचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती तर त्याचा मित्र श्रीकांत गोरे हा बेपत्ता होता. दोन दिवसांनी रविवार 16 जानेवारी 2022 रोजी महादेव गोरे यांच्या शेतातील विहीरीमध्ये पुतण्या चेतन मुंदडा याचा प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांच्या पथकाने आपली यंत्रणा कामाला लावली अन् चेतन मुंदडा याचा बेपत्ता असलेला मित्र श्रीकांत गोरे याला शोधून काढलं. 24 तासांच्या आता श्रीकांत गोरे याचा ठावठिकाणा लावण्यात पोलिसांना यश आले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Murder, Nagpur

पुढील बातम्या