Home /News /nagpur /

दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं; एक रामटेक तर भंडाऱ्यात आढळला दुसरा मृतदेह

दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं; एक रामटेक तर भंडाऱ्यात आढळला दुसरा मृतदेह

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

आरोपीने आपल्याच आत्याचा काटा काढला.

नागपूर, 21 जानेवारी : अनैतिक संबंधाची माहिती पतीला दिल्याच्या रागातून भाचीने प्रियकराच्या मदतीने आत्या सह दोघांची निघृणपणे हत्या (Nagpur Crime News) केल्याचं समोर आलं आहे. रामटेकमध्ये घडलेल्या या थरारक हत्याकांडाचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. महत्त्वाचे म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात फेकले होते. मात्र तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. या घटनेत संदीप मिश्रा व जयवंता भगत यांची हत्या केली म्हणून रितू बागलबांदे व महेश नागपुरे आरोपींना अटक केली. संदीप हे जयवंता (आरोपीची आत्या) यांचे मानलेले भाऊ होते. गेल्या सहा वर्षापासून दोघेही रामटेकमधील एका शेतात काम करायचे व तेथेच राहायचे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी जयवंता यांची भाची रितु व प्रियकर महेश नागपुरे हे रामटेके येथे आले होते. दोघेही त्यांच्या सोबत राहून अन्य शेतात काम करायचे. दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात फेकले मृतदेह जयवंता यांनी रितूच्या पतीला याबाबत सांगितले. त्यामुळे तिचा पती रामटेकला आला त्याने रितूला फटकारले व सोबत घेऊन गेला. प्रेम प्रकरणाची माहिती पतीला दिलाने रितू व प्रियकर महेश संतापले. दोन अल्पवयीन मित्राच्या मदतीने रितू व महेशने कारने रामटेक गाठले. संदीप व जयवंताला बळजबरीने कारमध्ये बसून जंगलात नेले. कुऱ्हाडीने त्यांची हत्या करून संदीपचा मृतदेह रामटेकच्या जंगलात फेकला व जयवंताचा मृतदेह भंडाऱ्याच्या जंगलात फेकला. हे ही वाचा-मुलीवर बलात्कार करणाऱ्याला बापाने कोर्टाच्या गेटसमोरच संपवलं;जामीनावर होता बाहेर मंगळवारी पोलिसांना संदीपचा मृतदेह आढळला. त्यांनतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले. संदीप सोबत राहणारे जयवंता ही देखील बेपत्ता असल्याने तिचाही शोध सुरू झाला. भंडारा जिल्ह्यात पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला त्यानंतर जयवंताच्या कुटुंबाला याची माहिती दिली. रितू ही आपल्या प्रियकरासोबत रामटेकला आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोघांना ताब्यात घेतले असता दोघांनी हत्याकांड घडवून आणल्याची कबुली दिली. त्या नंतर हा घटनाक्रम उघडकीस आला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Murder, Murder Mystery, Nagpur News

पुढील बातम्या