नागपूर, 09 जुलै: नागपूरमध्ये (Nagpur) दोन शेतकरी (Farmers) नदीच्या पुरात (Flood) वाहून गेल्याची घटना घडली आहे. गुरुवारी जिल्ह्यात पावसानं थैमानं घातलं होतं. त्यामुळे संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाल्यांना पूर आला. याच दरम्यान ही दुर्घटना घडली आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील गोवरी नदीला पूर आला होता. यातच कळमेश्वर पाटणसावंगी जाणाऱ्या रस्त्यावर कळमेश्वर शहराला लागूनच ही नदी आहे. या नदीवरचा पूल ओलांडताना दुचाकीने जाणारे दोन शेतकरी पुरात वाहून गेल्याची घटना घडली.
नागपुरात दोन शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले pic.twitter.com/U1DnyNFzyF
— News18Lokmat (@News18lokmat) July 9, 2021
अण्णाजी निंबाळकर आणि प्रवीण शिंदे अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. दोघे शेतकरी कळमेश्वर येथे साहित्य खरेदी करण्यासाठी आले होते. साहित्य घेऊन परत गावाला जात असताना ही दुर्घटना घडली. गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांकडून अजूनही त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.