नागपूर, 16 ऑगस्ट : सेल्फीच्या (Selfie) नादात दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू (Two brothers died) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द (Gosekhurd Nagpur) येथे 15 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गोसेखुर्द धरणाच्या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी तेथे सेल्फी काढण्याचा मोह न आवरल्याने अनेकांनी सेल्फी काढण्यास सुरुवात केली. सेल्फी काढत असताना पाय घसरल्याने दोन इसमांचा बुडून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या गोसेखुर्द येथे स्वातंत्र्य दिनानिमित्य पर्यटनाला गेलेले दोन सख्खे भाऊ पाण्यात बुडाले. सेल्फी काढत असताना मातीच्या ढिगाऱ्यावरुन दोन भावंडांपैकी एकाचा पाय घसरला आणि तो वाहत्या पाण्यात पडला. आपल्या भावाला वाचवण्यासाठी दुसऱ्या भावाने पाण्यात उडी मारली.
सेल्फीच्या नादात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू pic.twitter.com/R0bH1zKa2k
— Sunil Desale (@SunilDesale2) August 16, 2021
अचानक साप दिसला अन् काळजाचा ठोका चुकला; नगरमध्ये कड्यावरून कोसळून मुलाचा मृत्यू
सेल्फी क्लिक करत असताना मंगेश जुनघरे याचा मातीच्या ढिगाऱ्यावरुन पाय घसरला आणि तो वाहत्या पाण्यात पडला. मंगेशला वाचविण्यासाठी विनोद जुनघरे याने पाण्यात उडी मारली. मात्र, दुर्दैवाने दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला. हे दोघेही नागपुरातील उमरेड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मंगेश जुनघरे याला 4 वर्षांचा एक लहान मुलगा आहे तर विनोद जनुघरे याला 1 वर्षांची मुलगी आहे. दोन्ही भावंडे बुडाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी एसडीआरएफ आणि स्थानिकांनी तात्काळ शोधमोहिम हाती घेतली. मात्र, दुर्दैवाने दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur, Shocking viral video