मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

नागपुरमध्ये आजी आणि माजी गृहमंत्र्यांमध्ये गुप्त बैठक; चर्चांना उधाण

नागपुरमध्ये आजी आणि माजी गृहमंत्र्यांमध्ये गुप्त बैठक; चर्चांना उधाण

Dilip Walse Patil and Anil Deshmukh meeting: राज्याचे आजी आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.

नागपूर, 21 मे: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param bir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसूलीचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आपल्या गृहमंत्री पदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. अनिल देशमुख यांच्या या राजीनाम्यानंतर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि अनिल देशमुख यांच्यात एक गुप्त बैठक (Secret meeting) झाल्याच माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल नागपूर येथे दाखल झाले त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रम आटपून दिलीप वळसे पाटील नागपूरात रात्री दाखल झाले. यानंतर मध्यरात्री साधारणत: 1 वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख हे दिलीप वळसे पाटलांच्या भेटीला पोहोचले.

शासकिय निवासस्थान असलेल्या रवी भवन येथे दिलीप वळसे पोहोचल्यावर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख हे रवी भवन येथे दाखल झाले. साधारणत: एक तास या दोन नेत्यांच्यात बैठक झाली. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सीबीआयची छापेमारी

अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणी चौकशी सुरू केली आणि अनिल देशमुख यांच्यावर एफआयआर दाखल केला. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या टीमने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरांवर छापेमारी सुद्धा केली होती.

First published:

Tags: Anil deshmukh, Nagpur