VIDEO: नागपुरात रंगली भलतीच चर्चा; भूत सीसीटीव्हीत कैद झाल्याचा करतायत दावा

VIDEO: नागपुरात रंगली भलतीच चर्चा; भूत सीसीटीव्हीत कैद झाल्याचा करतायत दावा

सीसीटीव्हीमध्ये दिसणारी प्रतिमा ही एखादी वस्तू आहे जी हवेने उडत सीसीटीव्ही कॅमेरा समोरून गेली असावी असे अंनिसच्या कार्यकर्यांनी तज्ज्ञांशी बोलून मेश्राम कुटुंबियांना व स्थानिकांना समजावून सांगितले.

  • Share this:

नागपूर, 28 जुलै: नागपूरच्या शताब्दी नगर (Shatabdi Nagar Nagpur) भागात सध्या एका भुताच्या (Ghost) अफवेची खूप चर्चा आहे. राजेंद्र मेश्राम (Rajendra Meshram) यांच्या घरच्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) एक प्रतिमा जमिनीवरून हवेत वर जातांना दिसली. त्यांनतर मेश्राम कुटुंबीयांनी हे भूत असल्याचा दावा केला व परिसरात इतरांना माहिती दिली. मात्र स्थानिकांनी व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ती प्रतिमा प्लास्टिकची पिशवी असल्याचे सांगत मेश्राम कुटुंबीय याचा दावा फेटाळून लावला. शेवटी अफवा ती अफवा परिसरात वेगाने पसरल्याने सध्या नागपूरमध्ये या भुताची खूप चर्चा स्थानिकांच्या तोंडी पाहायला मिळत आहे. न्यूज 18 लोकमत या अफवेचं समर्थन करत नाही केवळ नागरिकांमध्ये जी सध्या चर्चा सुरू आहे त्याचं वृत्तांकन करत आहोत.

राजेंद्र मेश्राम हे नागपूरच्या शताब्दी नगरमध्ये राहतात. व्यवसायाने ऑटो चालक आहे. त्यांच्या घराला लागून एक जुने पडके घर आहे. त्याच्या एका गैरसमजाने आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे. त्यांच्या घरच्या सीसीटीव्हीमध्ये 19 जुलैला रात्री साडेबारा वाजता एक प्रतिमा कैद झाली. सीसीटीव्हीमध्ये एक प्रतिमा जमिनीवरून हवेत वर जातांना दिसत आहे. त्यांनतर मेश्राम कुटुंबीयांनी हे भूत असल्याची भीती मनात धरली. त्यांच्या घरा शेजारी एक पडके घर आहे त्यात कोणी राहत नाही. त्याच घराच्या बाजूला एक विहीर आहे काही वर्षा आधी एका मुलीने तेथे आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

त्या भागातून विचित्र आवाज ऐकाला येतात व तो याच भुताचा आवाज असल्याचा मेश्राम कुटुंबाचा दावा आहे. मात्र ते आता यावर कॅमेरापुढे बोलायला तयार नाही. स्थानिकांनी मात्र राजेंद्र मेश्राम यांचा दावा फेटाळून लावला असून हा त्यांचा भ्रम असून ही फक्त अफवा असल्याचे सांगितले. परिसरात कोणी भुताच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नसल्याचे ही स्थानिकांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राजेंद्र मेश्राम यांचे घर गाठले. त्यांचा दावा कसा तथ्य हीन आहे हे त्यांना सांगितले.

सीसीटीव्हीमध्ये दिसणारी प्रतिमा ही एखादी वस्तू आहे जी हवेने उडत सीसीटीव्ही कॅमेरा समोरून गेली असावी असे अंनिसच्या कार्यकर्यांनी तज्ज्ञांशी बोलून मेश्राम कुटुंबियांना व स्थानिकांना समजावून सांगितले. ज्यांचा भुतांवर विश्वास आहे त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे व 25 लाख रुपये अंनिस कढून घेऊन जावे असे ही आवाहन केले. सीसीटीव्हीच्या एका व्हिडीओने हा घोळ केला. त्यात मेश्राम कुटुंबीयांचा अज्ञानपणा आणि उतावळेपणा आज त्यांच्या अंगलाटी आला. आज स्थानिक तर आपल्याच घरी आहे. मात्र मेश्राम कुटुंबियांना अज्ञातवासात जावे लागले. ते ही फक्त एका गैरसमजातून..

First published: July 28, 2021, 5:55 PM IST

ताज्या बातम्या