नागपूर, 04 जून: नागपुरात (Nagpur Crime) पोलिसांकडून ऑपरेशन क्रॅक डाऊनच्या माध्यमातून गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात गुंडांचा हैदोस देखील सुरूच आहे. भरदिवसा पेट्रोल पंप (petrol pump) वर चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला आहे. तीन गुंडांनी हा प्रताप केल्याचं समजतंय.
सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उज्वलनगर येथील पेट्रोलपंपावर तीन गुंडांनी भर दिवसा चाकूचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नागपूर: भरदिवसा पेट्रोल पंपवर चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला आहे. pic.twitter.com/RgByfudzjg
— News18Lokmat (@News18lokmat) June 4, 2021
या घटनेत पेट्रोलपंपावर काम करणारा दिवाकर तिवारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेच्या काही तासात आरोपी अनिल वानखेडे, अजय यादव आणि रुपेस वरनकर या तिघांना पोलिसांनी अटक केलीय.
हेही वाचा- वाईट बातमी: भुकेमुळे नागपुरात बिबट्यासह 4 महिन्याच्या पिल्लाचाही मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nagpur