नागपूर हादरलं ! बलात्कार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर हादरलं ! बलात्कार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर पुन्हा हादरलं ! जामीनावर सुटलेल्या आरोपीची बलात्कार पीडितेला धमकी, अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचललं.

  • Share this:

नागपूर, 16 सप्टेंबर : नागपुरमध्ये एका 17 वर्षीय बलात्कार पीडित तरुणीने गाळफास (Rape victim suicide) घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या (Nagpur) जरीपटका पोलीस (Jaripataka) ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित तरुणी ही 11 वी वर्गात शिकत होती. विकास भुजाडे नावाच्या तिच्या नातेवाईकने फूस लावून तिचे अपहरण केले होते आणि बंगळुरूला घेऊन गेला. लग्नाचे आमिष दाखवत ते बंगळुरूला एकत्र राहत होते. यावेळी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.

मुलगी बेपत्ता झाल्याने आई-वडिलांनी नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोधाशोध केली असता पीडित मुलगी विकासच्या तावडीत बंगळुरूला असल्याचे पुढे आले. त्यांनतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली आणि विकास बुजाडे याच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करत अटक केली. तीन दिवसा आधी विकास हा जामिनावर सुटला त्यांनतर त्याने पीडित मुलीशी संपर्क साधून तू माझी फसवणूक केली मी तुला सोडणार नसल्याची धमकी दिली.

आपल्यावर अत्याचार करून देखील विकास आपल्याला धमकी देतो आणि बाहेर मोकाट फिरत आहे. याचा त्या पीडित तरुणीच्या मनावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे घरी कोणी नसतांना तिने गळफास घेऊन आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. पीडित मुलीच्या कुटुंबात आई-वडील आणि लहान भाऊ आहे. नागपुरच्या या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्या आहे.

...म्हणून नगरसेविकेनं तरुणाला दिली भयंकर शिक्षा; होम थिएटरचा आवाज वाढवून बेदम मारहाण, नागपुरातील घटना

पीडित मुलीच्या आई वडिलांनी मुलीच्या आत्महत्येला विकास भुजाडे हा जबाबदार असल्याचे सांगितले. विकास कारागृहातून जामीनावर बाहेर आल्यानंतर निर्ढावल्या सारखा वागत होता. त्याच्या पीडित मुलीच्या मनावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे तिने हे पाऊल उचलले असावे असा आरोप पीडितच्या नातेवाईकांनी केला.

नागपुरमध्ये या आधी देखील बलात्कार पीडितेला धमकवाने, न्यायालयात आपला जबाब बदलण्यासाठी दबाव आणल्याच्या घटना घडल्या आहे. काही घटनेत पीडितेला आरोपींकडून कारागृहातून बाहेर आल्यावर मारहाण करण्याचा घटना देखील पुढे आल्या आहेत. त्यामुळे बलात्कार पीडितेला त्याच्या प्रक्रियेतून जातांना कायदेशीर संरक्षण मिळण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.

First published: September 16, 2021, 2:34 PM IST

ताज्या बातम्या