मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

नागपूरात प्लंबर बनला 'नागोबा बाबा'; कोरोना रुग्णांना बरे केल्याचा दावा करणारा नागोबा पोलिसांच्या जाळ्यात

नागपूरात प्लंबर बनला 'नागोबा बाबा'; कोरोना रुग्णांना बरे केल्याचा दावा करणारा नागोबा पोलिसांच्या जाळ्यात

भोंदूबाबाचा पर्दाफाश, कोरोना रुग्णांना बरे केल्याचा दावा करणारा नागोबा बाबा नागपूर पोलिसांच्या जाळ्यात.

भोंदूबाबाचा पर्दाफाश, कोरोना रुग्णांना बरे केल्याचा दावा करणारा नागोबा बाबा नागपूर पोलिसांच्या जाळ्यात.

भोंदूबाबाचा पर्दाफाश, कोरोना रुग्णांना बरे केल्याचा दावा करणारा नागोबा बाबा नागपूर पोलिसांच्या जाळ्यात.

नागपूर, 15 मे: अंगात नागोबा संचारल्या नंतर मंत्रोउपचाराने कोरोना बरा बरा करण्याचा दावा करणार भोंदूबाबाला नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी गजाआड (Fake baba arrested) केले. 32 वर्षीय शुभम तायडे (Shubham Tayade) असे या भोंदू बाबाचे नाव असून तो नागपूरच्या पंचशील नगरमध्ये आपला दरबार चालवत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना या नागोबा बाबाच्या भोंदूगिरीचा प्रकार कळल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) सापळा रचून या भोंदू बाबाला अटक केली आहे.

हा नागा सारखा फुंकारणार आणि डोलणारा भोंदूबाबा शुभम तायडे आहे. याच्या अंगात नाग संचारला की हा कोरोना बरा होतो असा त्याचा दावा आहे. त्यासाठी तो मंत्रतंत्राचा वापर करायचा.. नागोबा बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भोंदू बाबाचा दर गुरुवारला नागपूरच्या पंचशील नगरमध्ये दरबार भरायचा. त्याच्याकडे मोठ्या संख्येने रुग्ण देखील जायचे. मात्र याने एका महिलेची फसवणूक केल्यानंतर हा प्रकार अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या कानावर आला त्यांनतर त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून या भोंदू बाबाला अटक केली आहे.

वाचा: VIDEO: राज्यात चाललंय तरी काय? आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, दोन दिवसांतील दुसरी घटना

हा भोंदू बाबा कोरोनाच्या उपचार व्यतिरिक्त पैशांचा पाऊस पाडणे, कौटुंबिक कलह दूर करणे, गुप्तधन शोधून देणे या नावावर देखील सामन्यांची फसवणूक करत होता. पेशाने प्लंबरचे काम करणारा हा भोंदूबाबा मागच्या दोन वर्षांपासून भोंदूगिरी करत होता. पोलिसांनी त्याला अटक केल्या नंतर त्याच्या भक्तांनी त्याला सोडण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. सद्या तो पोलिसांच्या कोठडीत असून या भोंदूबाबवर कडक कारवाई करावी अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

कोरोनावर लस उपलब्ध झाली आहे आणि त्यासोबतच इतरही औषधांवर जगात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असतांना अनेक रुग्ण विज्ञानाकडे वळण्यापेक्षा नागोबा बाबा सारख्या भोंदूच्या जाळ्यात अडकतात. यानंतर स्वताचा व इतरांचा जीव धोक्यात टाकतात. आजच्या काळातही असे घडत असल्याने नागरिकांमध्ये जागरूकता पसरवणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Crime, Nagpur