मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

परीक्षेत कॉपी कशी करावी? YouTube वरून सुरू होते धडे, पोलिसांनी दखल घेताच YouTuber फरार

परीक्षेत कॉपी कशी करावी? YouTube वरून सुरू होते धडे, पोलिसांनी दखल घेताच YouTuber फरार

परीक्षेत कॉपी कशी करावी, याचे धडे यूट्यूब चॅनेलवरून देणाऱ्या आरोपीचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.  हे  व्हिडिओ यूट्यूबवरून हटवण्यात आले आहेत.

नागपूर, 30 जून : परीक्षेत कॉपी कशी करावी, याचे धडे यूट्यूब चॅनेलवरून देणाऱ्या आरोपीचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या परीक्षेला बसताना कॉपी कशी करावी, याचे धडे एका यूट्यूब चॅनेलवरून दिले जात होते. विद्यापीठाला याची माहिती मिळताच पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आणि हे व्हिडिओ यूट्यूबवरून हटवण्यात आले. पोलीस सध्या हे व्हिडिओ तयार करून अपलोड करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

या व्हिडिओमध्ये यूट्यूबर महाभागाने 'द एलपी व्हिलेजर' म्हणून चॅनल बनवले असून यावर व्हिडिओ टाकले आहे. यात 'गाइज, कोई फरक नही पडेगा' असं म्हणत परीक्षा सुरू असतांना दुसरे टॅब ओपन करून परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधता येऊ शकतं, ‘एक्झाम स्क्रीन’ समोरून हटले तरी काही फरक पडणार नाही. कॅमेरा बंद झाला तरी फरक पडणार नाही, अशी बतावणी करण्यात आली आहे. यात 'बिना टेन्शन खुलके चिटिंग कर सकते है, गाईस' अस सांगण्याचा प्रताप या महाभागानं केला आहे. हा प्रताप कळताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गंभीरतेने दखल घेत पोलिसांत याची तक्रार केली आहे.

हे वाचा -मेव्हणीला वश करण्यासाठी आलोकचे भयावह प्रकार;नागपूर हत्याकांडाची महत्त्वाची अपडेट

29 जून पासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत आहेत. व्हिडिओत सांगितलेली माहिती धोकादायक असून जर का कुणी यातील गोष्टींचे ऑनलाईन परीक्षेत अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर ऑनलाईन पद्धतीतल्या आटो सिस्टम नुसार विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागण्याचा धोका आहे. त्यामुळे कुणीही याचे अनुकरण करू नये, असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास नागपूर सायबर सेल करत असून त्यांनी यूट्यूबवरून हा व्हिडिओ हटवला आहे.

First published:

Tags: Cyber crime, Nagpur