Maharashtra Zilla Parishad Election 2021: नागपूर या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा, भाजपचं वर्चस्व

Maharashtra Zilla Parishad Election 2021: नागपूर या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा, भाजपचं वर्चस्व

Nagpur Election Results 2021: ही पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) ताब्यात होती. राष्ट्रवादीच्या हातातून नरखेड पंचायत समितीवर भाजपने विजय मिळवल्याने हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

नागपूर, 06 ऑक्टोबर: नागपुरातील नरखेड पंचायत समितीच्या (Narkhed Panchayat Samiti) जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) नागपुरातील नरखेड पंचायत समितीच्या (Narkhed Panchayat Samiti) जागांवर विजय मिळवला आहे. हा विजय मिळवून या जागांवर भाजपनं आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे.

नरखेड तालुका

बेलोना पंचायत समिती

हेमलता सातपुते - भाजपा - 2729

अपूर्णा भुक्ते - राष्ट्रवादी - 2221

विजयी हेमलता सातपुते 508 मतांनी

अकोल्यात भाजपला मोठा Shock, वंचितची सत्ता कायम; सर्व जागांचे निकाल जाहीर

 नरखेड तालुका

सावरगाव पंचायत समिती

स्वप्निल नागापूरे - भाजपा - 1868

प्रविण वासाडे - अपक्ष - 2221

विजयी स्वप्निल नागापूरे 2 मतांनी विजयी.

नरखेड तालुका

सावरगाव जिल्हा परिषद

पार्वताबाई काळबांडे - भाजपा - 5365

अंजली शिंदे - अपक्ष - 5198

विजयी पार्वताबाई काळबांडे 198 मतांनी विजयी.

निवडणुकीतील सर्वांत मोठी बातमी: Shivsena खासदाराच्या मुलाचा पराभव

ही पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) ताब्यात होती. राष्ट्रवादीच्या हातातून नरखेड पंचायत समितीवर भाजपने विजय मिळवल्याने हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

मविआचा भाजपला दे धक्का, नंदुरबार जिल्हा परिषदेवर मिळवली सत्ता

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यापासून ते गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहेत. अनिल देशमुख आपल्या मतदारसंघातही नसल्याने या निवडणुकीत काय होतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली नरखेड पंचायत समिती भाजपने आपल्याकडे खेचून घेतली आहे.

First published: October 6, 2021, 2:25 PM IST

ताज्या बातम्या