Home /News /nagpur /

Nagpur Nude Dance: नागपुरातील न्यूड डान्स प्रकरणात उपसरपंच रितेश आंबोनेच निघाला आयोजक, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Nagpur Nude Dance: नागपुरातील न्यूड डान्स प्रकरणात उपसरपंच रितेश आंबोनेच निघाला आयोजक, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

नागपूर न्यूड डान्स प्रकरणात पोलिसांनी आता गावाच्या उपसरपंचाला अटक केली आहे. गावचा उपसरपंच असलेल्या रितेश आंबोने यानेच या न्यूड डान्सच आयोजन केल्याचं तपासात समोर आलं आहे. (Nagpur deputy sarpanch arrest by police over organising nude dance)

पुढे वाचा ...
नागपूर, 28 जानेवारी : नागपुरात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाच्या नावाने चक्क न्यूड डान्स (Nude dance) सुरू असल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली. या न्यूड डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याचं पाहून सर्वचजण चक्रावले. (Nude dance in Nagpur Shamiana video goes viral) या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांचा तपास सुरू असताना आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुरातील या न्यूड डान्स प्रकरणात पोलिसांनी ब्राह्मणी गावाचा उपसरपंच रितेश आंबोने (Deputy Sarpanch Ritesh Aambone) याला अटक केली आहे. रितेश आंबोने हाच या न्यूड डान्सचा आयोजक असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. न्यूड डान्सचं आयोजन अनेकांनी मिळून केलं होतं. अनेक आयोजकांपैकी रितेश आंबोने हा सुद्धा एक असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी रितेश आंबोने याला बेड्या ठोकल्या आहेत. वाचा : नागपुरात रात्रीस खेळ चाले; गावाबाहेर शामियानात चालतो चक्क न्यूड डान्स, VIDEO VIRAL 100 रुपयांत रबर स्टॅम्पसह एन्ट्री पबमध्ये ज्या प्रकारे रबर स्टॅम्प हातावर मारुन प्रवेश दिला जातो अगदी त्याच पद्धतीने या न्यूड डान्स कार्यक्रमात आंबट शौकीनांना प्रवेश दिला गेला होता. यासाठी प्रत्येकाकडून 100 रुपये आकारण्यात आले होते. या सर्वांच्या हातावर रबर स्टॅम्पचा शिक्का मारण्यात आला होता आणि हा शिक्का सुद्धा उपसरपंच रितेश आंबोने यानेच उपलब्ध करुन दिला होता असं समोर आलं आहे. 16 आरोपींना अटक या न्यूड डान्स प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपल्या टीम तयार करुन तपास सुरू केला. या न्यूड डान्स प्रकरणात आतापर्यंत एकूण 16 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी 12 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उपसरपंच रितेश आंबोने हा कार्यक्रमाचा आयोजक होता आणि त्याला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला गुरुवारी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाचा : रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाची डॉक्टरांना मारहाण, रुग्णालयात तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद रात्रीच्या अंधारात विवस्त्र डान्स मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि कुही या तालुक्यांतील गावांत अनेक ठिकाणी डान्सच्या संदर्भात जाहिराती लावण्यात आलेल्या आहेत. रात्र होताच गावाबाहेरील बंद शामियानात हे डान्स सुरू होतात. त्यानंतर रात्रीच्या अंधारात येथे न्यूड डान्सचे खेळ सुरू होते. व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ धक्कादायक म्हणजे शंकरपटाच्या नावाखाली हे सर्व प्रकार सुरू असल्याचं बोललं जात आहे. हे न्यूड डान्स पाहण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी असल्याचंही दिसून आलं. नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Nagpur

पुढील बातम्या