नागपुरातील नाग नदीत रक्तरंजित थरार! अनैतिक संबंधातून हत्या; VIDEO VIRAL

नागपुरातील नाग नदीत रक्तरंजित थरार! अनैतिक संबंधातून हत्या; VIDEO VIRAL

Murder in Nag River Nagpur: नागपुरात भरदिवसा एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

नागपूर, 22 जून : नागपूर (Nagpur) मधील हत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अवैध संबंधातून आणखी एकाची हत्या (Murder) झाल्याचं समोर आलं आले. योगेश घोंगळे या तरुणाची धारधार शस्त्राने करण्यात आली हत्या करण्यात आली. आरोपी सुशील धोटे आणि त्याच्या मित्राने ही हत्या केली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Viral video) होत आहे.

मृतकाने आपला जीव वाचवण्यासाठी नाग नदीच्या (Nag River) पाण्यात उडी मारली. मात्र आरोपींनी त्याला तेथे पकडून धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगनाडे चौक परिसरातील ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या आणि आत्महत्या

नागपुरात सोमवारी (21 जून 2021) रोजी एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. नागपुरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल माटूळकर या व्यक्तीने आपली पत्नी, मुलगी, मुलगा, सासू आणि मेव्हणीची हत्या केली. या पाच जणांच्या हत्या केल्यानंतर आरोपी अमोल याने स्वत: आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवले. कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून अधिक तपास सुरू आहे.

Published by: Sunil Desale
First published: June 22, 2021, 11:02 PM IST

ताज्या बातम्या