नागपूर, 26 जून: राज्यात अद्यापही कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कायम आहे. त्यातच आता डेल्टा प्लस (Delta plus variant of Corona) या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाही काही नागरिक सर्रासपणे या नियमांकडे दुर्लक्ष करुन नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. अशाच प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका नवरदेवाला नागपूर महानगरपालिकेने दंड ठोठावत (Nagpur groom fined for not wearing mask) कारवाईचा आहेरच दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात लग्न समारंभ पार पडल्यावर एका नवरदेवाची वरात काढण्यात आली होती. नवरदेव घोड्यावर बसलेला होता आणि त्याच्यासोबत वरातीतील काही मंडळी सुद्धा होती. मात्र, कोविडच्या या संकटात चेहऱ्यावर मास्क त्यांनी लावलाच नव्हता. यामुळेच नागपूर मनपाच्या अधिकाऱ्यांनी या नवरदेवाला दंड ठोठावला आहे.
Sankashti Chaturthi 2021: संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे Facebook, WhatsApp मेसेज
केवळ नवरदेवच नाही तर वरातीत सहभागी झालेल्या नातेवाईकांनीही चेहऱ्यावर मास्क परिधान केला नव्हता. त्यामुळे या वरातीत सहभागी झालेल्यांवर दंडात्मक कारवाई करुन दंड वसूल केला आहे. नागपुरातील नेहरूनगर येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता निर्बंध
कोविडच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. INSACOG (कोविड-19च्या संदर्भात संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी स्थापित केलेला प्रयोगशाळांचा संघ) यांनी सूचित केल्यानुसार डेल्टा प्लस हा व्हेरिएंट खालील वैशिष्ट्यांमळे चिंतेचा विषय आहे. वाढती संक्रमणशीलता, फुप्फुसाच्या पेशींना मजबुतीने चिकटण्याची क्षमता मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या प्रतिसादात संभाव्य घट तसेच ही व्हीओसी महाराष्ट्रात रत्नागिरी, जळगाव आणि इतर जिल्ह्यांत सापडले आहेत. त्यामुळे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.