नागपुरातील 'त्या' निर्दयी मातेला मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा

नागपुरातील 'त्या' निर्दयी मातेला मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा

MNS women activist taught lesson to ruthless mother: आपल्या चिमुकल्याला बेदम मारहाण करणाऱ्या त्या निर्दयी मातेचा मनसे महिला कार्यकर्त्यांनी समाचार घेतला आहे.

  • Share this:

नागपूर, 5 जून: काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Video viral in Social Media) झाला होता. या व्हिडीओत एक महिला आपल्या लहानग्या मुलाला बेदम मारहाण (child beaten) करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल (video viral in social media) झाला आणि सर्वांनीच महिलेच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला होता. याच निर्दयी मातेला मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी (Nagpur MNS women) आज चांगलाच धडा शिकवला आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेला तो व्हिडीओ नागपूर शहरातील असल्याचं लक्षात येताच मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या निर्दयी मातेचा शोध घेतला. त्यानंतर मनसेच्या महिला पदाधिकारी थेट या महिलेच्या घरी दाखल झाल्या आणि तिला आपल्या मनसे स्टाईलने धडा शिकववत चांगलाच समाचारही घेतला.

नागपुरातील थरार नाट्य संपुष्टात; दीड तासानंतर ओलीसांची सुटका, पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी केवळ या महिलेला धडा शिकवला नाही तर त्याच दरम्यान मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी या महिलेला आर्थिक मदत सुद्धा दिली. तसेच जर मदतीची आवश्यकता असल्यास आम्हाला संपर्क कर असंही या महिलेला सांगितलं.

काय आहे संपूर्ण घटना?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सासू सोबत झालेल्या वादानंतर या महिलेने आपल्या चिमुकल्याला बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली होती आणि त्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, ही महिला आपल्या सासूसोबत भांडण करताना मुलाला बेदम मारहाण करत आहे. इतकेच नाही तर त्याला उचलून गादीवर आपटल्याचं सुद्धा दिसत आहे.

Published by: Sunil Desale
First published: June 5, 2021, 10:26 PM IST

ताज्या बातम्या