मोठी बातमी: नागपूरमध्ये कोविड केअर हॉस्पिटलला आग, चार रुग्णांचा मृत्यू

मोठी बातमी: नागपूरमध्ये कोविड केअर हॉस्पिटलला आग, चार रुग्णांचा मृत्यू

Nagpur Fire: नागपुरातील कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

  • Share this:

नागपूर, 9 एप्रिल: नागपूर शहरातील (Nagpur city) वाडी येथील वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला (Well Treat Covid Hospital) अचानक आग लागल्याचं समोर आलं आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. साधारणत: 8.45 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या (Fire brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांनी पळापळ सुरू केली होती.

रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले. रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे. मात्र, या आगीच्या धुरामुळे चार रुग्णांना त्रास झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत चार रुग्णांचा मृत्यू (4 patients died) झाला आहे. मृतकांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या घटनास्थली कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे.

या रुग्णालयात एकूण 28 रुग्ण दाखल होते आणि त्यापैकी 10 रुग्ण हे आयसीयूमध्ये दाखल होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. त्यासोबतच रुग्णालयातील रुग्ण, कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्याचे काम सुरू केले.

मुंबईत कोविड रुग्णालयाला लागलेली आग

काही दिवसांपूर्वी मुंबईतील भांडूप परिसरात असलेल्या सनराइज कोविड रुग्णालयाला अचानक आग लागली होती. या आगीत 10 रुग्णांनी आपले प्राण गमावले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली त्याची माहिती समोर आलेली नाहीये. आग लागलेल्या घटनास्थळी मुख्यमंत्री, महापौर सर्वांनीच भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच मृतकांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली होती.

Published by: Sunil Desale
First published: April 9, 2021, 10:16 PM IST
Tags: firenagpur

ताज्या बातम्या