नागपूरमध्ये यंदाही रक्तरंजित होळी! अज्ञातांकडून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

नागपूरमध्ये यंदाही रक्तरंजित होळी! अज्ञातांकडून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

नागपूरचा होळीचा रक्तरंजित इतिहास आहे. त्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, मात्र..

  • Share this:

नागपूर, 29 मार्च : नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं की, नागपूरचा होळीचा रक्तरंजित इतिहास आहे. त्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना बोलावून त्यांना विशेष सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र शेवटी हे नागपूर आहे. हत्येला, हत्येच्या प्रयत्नाला विशेष कारण लागत नाही. आज रंगपंचमीला तेच घडले क्षुल्लक कारणावरून लखन गायकवाड या युवकाची हत्या करण्यात आली. घटना नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाबाई मोक्षधामच्या दारावर घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आपआपसातील वादातून करण्यात आली. तीन ते चार अज्ञात आरोपींनी मिळून धारधार शस्त्राने हल्ला करून लखन गायकवाड झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी माहिती दिली. आरोपी हे मृत व्यक्तीचे परिचित असावे व त्यांच्यातील जुन्या अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे.

तर अजनी भागात एक हत्येचा प्रयत्न झाला. त्यातल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. तिसरी घटना मिनीमाता नगरमध्ये घडली. असामाजिक तत्वाने हुल्लडबाजी करत वानखेडे परिवारावर तलवारीने हल्ला केला. त्या हल्ल्यात कुटुंबातील तरुणीच्या हाताला गंभीर इजा झाली. तिला उपचारासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. होळीच्या पर्वावर काही घातपात होऊ नये, यासाठी शुक्रवारच्या रात्रीपासूनच पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं होत.

हे ही वाचा-नागपूरवरील संकट गडद; 24 तासांत 35 जणांचा मृत्यू, कोरोनाची धक्कादायक आकडेवारी

होळीच्या पर्वावर हत्या, हत्येचे प्रयत्न अशा गंभीर घटना घडू नये यासाठी अनेक वस्त्यांमध्ये बंदोबस्त लावला होता. सतत पोलिसांची पेट्रोलिंग सुरू होती तरी देखील जी भीती पोलीस आयुक्तांना होती तसेच घडले. या वर्षी देखील नागपूरमध्ये रक्तरंजित होळीची परंपरा कायम राहिली. विशेष म्हणजे तिन्ही घटनेतील आरोपी कृत्य करून पसार झाले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. नागपूर शहरात आज संचारबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यांवर विशेष गर्दी पाहायला मिळत नव्हती, असे असतांना तिन्ही घटना पोलिसांना चपराक लावणाऱ्या ठरल्या.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: March 29, 2021, 11:01 PM IST

ताज्या बातम्या