मराठी बातम्या /बातम्या /nagpur /नागपुरातील थरार नाट्य संपुष्टात; दीड तासानंतर ओलीसांची सुटका, पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

नागपुरातील थरार नाट्य संपुष्टात; दीड तासानंतर ओलीसांची सुटका, पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

नागपुरात आज दुपारच्या सुमारास एक थरारनाट्य घडलं. एक बंदुकधारी इसम थेट एका घरात शिरला.

नागपुरात आज दुपारच्या सुमारास एक थरारनाट्य घडलं. एक बंदुकधारी इसम थेट एका घरात शिरला.

नागपुरात आज दुपारच्या सुमारास एक थरारनाट्य घडलं. एक बंदुकधारी इसम थेट एका घरात शिरला.

नागपूर, 4 जून: नागपूर शहरातील पिपला (Pipla area of Nagpur) भागात आज दुपारच्या सुमारास एकच गोंधळ उडाला. त्याचं झालं असं की, एक बंदुकधारी इसम थेट एका घरात शिरला (Gunman enter into house) आणि घरातील नागरिकांना बंधक बनवलं. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसही लगेचच घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांनी या गुन्हेगाराला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

नागपूरच्या पिपला भागात एक पिस्तूलधारक युवकाने बिल्डरच्या कुटुंबाला बंधक बनवले होते. लुटीच्या उद्देशाने हा तरुण पिपला फाटा येथील राजू वैद्य यांच्या घरात शिरला होता. तब्बल दीड तासानंतर पोलिसांनी मोठ्या शिथाफीने बंदुकधारी व्यक्तीच्या ताब्यातून राजू वैद्य कुटूंबियांची सुटका केली.

गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, लुटीच्या उद्देशाने हा तरुण बिल्डर राजू वैद्य यांच्या घरात शिरला होता. त्याने बंदुकीचा धाक दाखवत घरातील नागरिकांना बंधक बनवलं त्यानंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी करू लागल्याचं बोललं जात आहे. हा तरूण कोण आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मोठ्या चतुराईने या कुटुंबाची सुटका केली. बंदुकधारी घरात शिरल्याची माहिती अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी बघ्यांनीही मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे बाहेर बघ्यांची गर्दी आणि आतमध्ये बंदुकधाऱ्याने कुटुंबाला ओलीस केलेल्यांची सुटका करणं असं दुहेरी टास्क पोलिसांसमोर होतं.

First published:
top videos

    Tags: Crime, Nagpur