Home /News /nagpur /

Nagpur Crime: वृद्ध दाम्पत्याची 5 लाखांची रोकड लुटून आरोपी फरार, बँकेसमोरील घटना CCTV मध्ये कैद

Nagpur Crime: वृद्ध दाम्पत्याची 5 लाखांची रोकड लुटून आरोपी फरार, बँकेसमोरील घटना CCTV मध्ये कैद

वृद्ध दाम्पत्याची 5 लाखांची रोकड लुटून आरोपी फरार, बँकेसमोरील घटनेचा LIVE VIDEO

वृद्ध दाम्पत्याची 5 लाखांची रोकड लुटून आरोपी फरार, बँकेसमोरील घटनेचा LIVE VIDEO

Nagpur couple looted caught in CCTV: बँकेतून पैसे काढून घराकडे निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला लुटल्याची घटना समोर आली आहे. नागपुरातील एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे.

नागपूर, 4 मार्च : बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याला लुटण्यात (elderly couple looted) आल्याची दक्कादायक घटना नागपुरात (Nagpur) घडली आहे. एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेतून 5 लाख रुपयांची रोकड पिशवीत भरून नेताना पार्किंग रस्त्यावरच दोन बाईकस्वारांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून हिंगणा मार्गाकडे पळ काढला. ही घटना गुरुवारी (3 मार्च 2022) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने एमआयडीसी (Nagpur MIDC) परिसर हादरून गेला असून पोलीस हिंगणा मार्गावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज वरून आरोपींचा शोध घेत आहे. मीना (वय 62) आणि शिवप्रसाद सुखदेव विश्वकर्मा (वय 65) हे दाम्पत्य नागपुरातील यशोदा नगर, हिंगणा रोड परिसरात राहतात. शिवप्रसाद हे राज्य राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त सहा. पोलीस उपनिरीक्षक आहेत. घराच्या बांधकामासाठी ते पत्नीसोबत स्कुटरने एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून 5 लाख रुपये काढल्यानंतर त्या पिशवीत ठेवून पत्नीच्या हातात ती पिशवी दिली. बँकेच्या बाहेर रस्त्यावर ठेवलेली स्कुटर सुरू करीत असताना मागून बाईकवर दोन आरोपी आले आणि त्यांनी मीना यांच्या हातातील ती पिशवी हिसकावून पळून गेले. त्या पिशवीमध्ये पाच-पाचशे रुपयांच्या 100 नोटा असे एकूण पाच लाख रुपये, बँकेचे पासबूक आणि मोबाइल फोन होता. वाचा : लग्नानंतर पत्नीचं सीक्रेट कळताच पतीला बसला मोठा धक्का, VIDEO शूट करत उचललं धक्कादायक पाऊल या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर आणि स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. आरोपी हे घटनास्थळावरून हिंगणा मार्गाकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त लोहित मतानी, सहा पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे यांनी सुद्धा घटनास्थळा ची पाहणी केली. आरोपी हे बँकेमधूनच मागावर असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे बँकेतील सुद्धा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 30-35 वर्षे वयाचे असल्याची माहिती त्या दाम्पत्याने दिली. इतर वर्णनावरून हिंगणा मार्गावर ठिकठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासले जात आहेत. या घटनेनंतर परत एकदा नागपूर शहरांमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाला असून मध्यंतरी कमी झालेले चैन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग या घटनेनंतर परत चर्चेत आली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cctv, Crime, Nagpur

पुढील बातम्या