Home /News /nagpur /

बर्ड फेस सर्जरीमुळे 35व्या वर्षी साजरा केला पहिला वाढदिवस, लातुरच्या मुलीला नागपुरात जीवनदान

बर्ड फेस सर्जरीमुळे 35व्या वर्षी साजरा केला पहिला वाढदिवस, लातुरच्या मुलीला नागपुरात जीवनदान

फक्त लातूरचा विषय नाही तर विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यात देखील मोठ्या संख्येने रुग्ण हे शस्त्रक्रियांसाठी नागपूरच्या दंत महाविद्यालयामध्ये येतात.

नागपूर, 5 जानेवारी : नागपूर शासकीय दंत महाविद्यालयात (Nagpur Government Dental College) लातूरच्या रेखा सुर्यवंशी (Rekha Suryawanshi) या 35 वर्षीय रेखा सूर्यवंशीला कृत्रिम जबडा बसवण्यात आला आहे. तिला जन्मताच खालचा जबडा नव्हता. याला वैद्यकीय भाषेत 'बर्ड फेस' म्हणतात. रेखाला सामान्य जीवन जगता येत नव्हते, बोलतांना, जेवतांना तिला त्रास होत होता. त्यानंतर ती उपचारासाठी नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात आली. डॉक्टरांच्या टीमने तिची परिस्थिती बघितली त्यानंतर तिची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सामान्य माणसाचा खालचा जबडा असतो तिथे दोन कट देऊन डिस्ट्रॅक्टशन ओप्टोजेनिस शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये जो मेटलचा साचा जबड्यात बसवण्यात येतो तो हळूहळू हाडांच्या वाढीसोबत जबड्यात घट्ट होत जातो. त्यामुळे रेखा सूर्यवंशीचा खालचा जबडा हळू हळू पुनर्जीवित होत आहे. सहा महिन्यानंतर रेखा सामान्य जीवन जगू शकणार आहे. अशी माहिती ही सर्जरी करणारे डॉ डवरे यांनी दिली. रेखाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तिच्या भावाने देखील समाधान व्यक्त केले. आज रेखाचा वाढदिवस आहे हे महाविद्यालयातील डॉक्टरांना कळल्यानंतर रेखा सूर्यवंशीचा आयुष्यातील पहिला वाढदिवस देखील डॉक्टरांनीच साजरा केला. हा क्षण तिच्या आयुष्यात आला तो एका शस्त्रक्रियेमुळे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वाचा : तुम्हाला माहीत आहे का? या Vitamin च्या कमतरतेमुळं स्मरणशक्ती होत जाते कमी या शास्त्रक्रिय नंतर दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अभय दातारकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नागपूरचे शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय हे मध्य भारतामध्ये एक प्रसिद्ध शासकीय रुग्णालय आहे. ज्यामध्ये अत्यंत क्रिटिकल अशा शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या जातात. रेखा सूर्यवंशी ही देखील मूळची लातूरची आहे. तिला तिथल्या स्थानिक डॉक्टरांनी सांगितले की, शासकीय दंत महाविद्यालय नागपूर येथे ही सर्जरी उत्तम प्रकारे होऊ शकते. त्यामुळे तिने नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयची निवड केली. फक्त लातूरचा विषय नाही तर विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यात देखील मोठ्या संख्येने रुग्ण हे शस्त्रक्रियांसाठी नागपूरच्या दंत महाविद्यालयामध्ये येतात. महाराष्ट्र शासनाच्या एका शासकीय रुग्णालयासाठी हा मानाचा तुरा आहे असे मत या दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अभय दातारकर यांनी व्यक्त केले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Health, Nagpur, Surgery

पुढील बातम्या