Home /News /nagpur /

परीक्षेत पास करण्याचं आमिष, विद्यार्थिनीकडे प्राध्यापकाची धक्कादायक मागणी

परीक्षेत पास करण्याचं आमिष, विद्यार्थिनीकडे प्राध्यापकाची धक्कादायक मागणी

नागपूरमध्ये (Nagpur) प्राध्यापकानं विद्यार्थिनीकडून शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

नागपूर, 30 एप्रिल: नागपूरमध्ये (Nagpur) प्राध्यापकानं विद्यार्थिनीकडून शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी प्राध्यापकाविरोधात (professor) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनीला परीक्षेत पास करण्याचं नाटक करुन प्राध्यापकानं शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. नागपुरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडितीच्या तक्रारीवरुन आरोपी प्राध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? राकेश गेडाम असं आरोपीचे नाव असून तो सिंधू महाविद्यालयाचा प्राध्यापक आहे. Computer सायन्समध्ये शिकणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीला प्रवेश मिळत नसल्यानं तिच्या मैत्रिणीच्या सांगण्यावरुन विद्यार्थिनीनं एक वर्षापूर्वी प्राध्यापक राकेश गेडाम यांची भेट घेतली होती. त्याने विद्यार्थिनीला गेडा येथे प्रवेशासाठी मदत केली होती. त्यानंतरही तो तिला मदत करत राहिला. पण प्रत्येक वेळी गेडाम विद्यार्थिनीला हात लावायचा, अशी माहिती समोर आलीय. ऐकावं ते नवलच! झाडाच्या खोडातून कोसळतो धबधबा  ''तू खूप गोड आहेस, तू वेगळी दिसतेस, बोलून जवळ यायचा आणि विद्यार्थिनीला सांगायचा की तू पास होण्यासाठी काय करू शकतेस', असं प्राध्यापकानं विचारल्याचं पीडितेनं सांगितलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्राध्यापकाचा हा प्रकार वाढल्या होता, त्या गोष्टीला कंटाळून तरुणीनं पोलिसात धाव घेतली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार पुढे आला.

तुमच्या शहरातून (नागपूर)

Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Crime, Nagpur, Nagpur News

पुढील बातम्या