मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

Nagpur मध्ये मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, मृत कोरोना रुग्णांचं साहित्य चोरणारी टोळी गजाआड

Nagpur मध्ये मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, मृत कोरोना रुग्णांचं साहित्य चोरणारी टोळी गजाआड

gang stealing material from dead Corona patients नागपूर पोलिसांनी कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाजवळील साहित्य चोरणाऱ्या टोळीलाच अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला असून अजूनही या प्रकरणी चौकशी केली जात आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नागपूर, 18 मे : नागपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा किंवा मुदड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात असा प्रकार समोर आला आहे. नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाजवळील साहित्य (dead Corona patients material) चोरणाऱ्या टोळीलाच (Gang)अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला असून अजूनही या प्रकरणी चौकशी केली जात आहे.

(वाचा-Remedisivir चोरलं आणि त्याऐवजी कोरोना रुग्णांना...; नर्सिंग स्टाफचा भलताच प्रताप)

कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णावर कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जातात. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी थेट रुग्णाच्या नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला जात नाही. रुग्णालय आणि स्मशानभूमीतील कर्मचारीच अंत्यविधी करतात. अनेकदा काही कंपन्यांना कंत्राट देऊन हे काम केलं जातं. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही एका खासगी कंपनीला कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचं काम देण्यात आलं होतं. पण हे काम करणारे कर्मचारी कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या साहित्याची चोरी करत असल्याचं समोर आलं आहे.

(वाचा-Beed Crime : भावकीचा वाद, कुऱ्हाडीने सपासप वार करत संपवले दोन सख्ख्या भावांना)

कोरोना रुग्णांच्या मृतदेहाजवळचे साहित्य चोरणाऱ्या या टोळीला नागपूरच्या तहसील पोलिसांनी गजाआड केलं आहे. गणेश डेकाटे आणि छत्रपाल सोनकुसरे अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघांकडून मृतांचे मोबाईल, घड्याळी, पैसे असा 1 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळी मध्ये आणखी काही आरोपी सहभागी आहेत का याचा शोध पोलिसांकडून केला जात आहे.

कोरोनाच्या या संकटकाळामध्ये माणुसकी संपली असल्याची अनेक उदाहरणं समोर आली. पण नागपुरात पाहायला मिळालेला हा प्रकार म्हणजे या सर्वावर कळस असं म्हणावं लागेल. कुटुंबातील व्यक्ती आपल्यातून गेली म्हटल्यावर अनेकदा कुटुंबीयांना त्यांच्या वस्तू किंवा मृतांकडे असलेल्या ऐवजाचा विचारच नसतो. अशा वेळी प्रामाणिकपणे त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या या वस्तू आठवण म्हणून तरी द्यायला हव्या. मात्र मुदड्याच्या टाळूवरचं लोणी खायची तयारी असणाऱ्या अशा अमानवी वृत्तीच्या लोकांना ते कसं समजणार.

First published:

Tags: Coronavirus, Nagpur