Home /News /nagpur /

Nagpur: नागपूर महिलेवर अ‍ॅसिड सदृश्य द्रव्य फेकल्याप्रकरणी आरोपी अटकेत, धक्कादायक माहिती उघड

Nagpur: नागपूर महिलेवर अ‍ॅसिड सदृश्य द्रव्य फेकल्याप्रकरणी आरोपी अटकेत, धक्कादायक माहिती उघड

नागपुरात भरदिवसा महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, घटनेचा Shocking VIDEO आला समोर

नागपुरात भरदिवसा महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, घटनेचा Shocking VIDEO आला समोर

Nagpur police arrest a man in acid attack case: नागपूर शहरात भरदिवसा महिलेवर अ‍ॅसिड सदृश्य द्रव्य फेकल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महिलेवर झालेली हल्ल्याच्या ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.

नागपूर, 22 जानेवारी : नागपूर शहरात (Nagpur City) एका महिलेवर आज सकाळच्या सुमारास महिलेवर अ‍ॅसिड सदृश्य द्रव्याने हल्ला (attack with acid like substance) करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास हाती घेत आरोपीचा शोध घेतला. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या (accused arrest by Nagpur Police) असून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी हा पीडित महिलेचा पती असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात नागपूर पोलिसांनी माहिती दिली आहे. नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक नागपूर पोलिसांनी सांगितले की, आज सकाळी साडे नऊ - पावणे दहा वाजण्याच्या सुमारास एक महिला सायकलवरुन जात होती. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने तिच्यावर अ‍ॅसिड सदृश्य द्रव्य महिलेच्या अंगावर टाकले अशी माहिती समोर आली होती. या घटनेनंतर पीडित महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित महिलेवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात संपूर्ण पोलीस पथकाने आरोपीला पकडण्यासाठी काम सुरू केले आणि आरोपीला अटक केली. पोलिसांचा प्राथमिक अंदाज काय? अटक करण्यात आलेला आरोपी हा पीडित महिलेचा पती असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघे पती आणि पत्नी वेगवेगळे राहत होते. आरोपी प्लंबरचे काम करतो आणि त्याने अ‍ॅसिड सारखे केमिकल महिलेच्या अंगावर टाकल्याचं समोर आलं आहे. वैयक्तिक वादातून त्याने हे कृत्य केले असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे. वाचा : वृद्ध दाम्पत्याची घरात घुसून निर्घृण हत्या, दुहेरी हत्याकांडाने भिवंडी हादरली अधिक तपास सुरू पीडित महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. पण भाजल्याच्या जखमा कधी कधी थोड्या उशीराने जाणवते. त्यामुले पीडित महिलेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आरोपीला अटक केली असून सर्व दिशेने आमचा तपास सुरू आहे. आरोपीचे ग्लोव्ज ताब्यात घेतले असून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत त्याचा अहवाल समोर आल्यावर हे केमिकल नेमके कोणते आहेत हे समोर येईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे. वाचा : बार्शीचा 'हर्षद मेहता' विशाल फटेला पोलिसांचा दणका,जप्त होणार कोट्यवधींची संपत्ती घटना सीसीटीव्हीत कैद घटनास्थळावरील सीसीटीव्हीत दिसत आहे की, पीडित महिला आपल्या सायकलवरुन जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक दुचाकीस्वार आला. या दुचाकीस्वाराने सायकलवरुन जाणाऱ्या महिलेवर अ‍ॅसिड सदृश्य द्रव्य फेकून हल्ला केला. हल्ला केल्यावर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cctv footage, Crime, Nagpur

पुढील बातम्या