नागपूर, 28 एप्रिल: कोरोना पँडेमिक (Coronvirus Pandemic) काळात अनेक व्यक्तींना असा अनुभव आला आहे की, ज्यावेळी आपल्या माणसांनी साथ सोडली तेव्हा काही परक्या व्यक्ती देवासारख्या धावून आल्या आहेत. तेही अगदी त्यांच्या प्राणांची बाजी लावत.. असाच काहीसा प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. 85 वर्षीय आजोबांनी एका तरुण व्यक्तीसाठी स्वत:चा ऑक्सिजन बेड सोडला आणि पुढील तीन दिवसात त्यांनी मृत्यूला कवटाळलं. नारायण भाऊराव दाभाडकर असं या आजोबांचं नाव. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दाभाडकर यांच्याविषयी ट्वीट शेअर केलं आहे.
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवर असणारे नारायण भाऊराव दाभाडकर नागपूरमध्ये एका रुग्णालयात भरती होते. त्यांची ऑक्सिजनची पातळी 60 वर आल्याने त्यांच्या मुलीने आणि जावयाने त्यांनी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात भरती केलं होतं. त्याठिकाणी महिला तिच्या चाळीशीतल्या नवऱ्याला ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी प्रयत्न करत होती. तिचं दु:ख नारायण दाभाडकर पाहू शकले नाहीत आणि त्यांनी मोठ्या निर्धाराने स्वत:चा बेड या स्त्रीच्या नवऱ्याला देण्याचं ठरवलं.
हे वाचा-कराच्या पैशांना म्हणाल्या दान; 1 कोटींची मदत करुनही किरण खेर होतायेत ट्रोल
नारायण दाभाडकर यांच्या निर्णयाला सुरुवातीला त्यांच्या घरच्यांनी विरोध केला पण एक मोलाचं कार्य करण्याचं ठरवलेल्या या माणसाच्या निर्धारापायी सगळे झुकले. मी जीवन जगलो आहे, या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर त्यांची मुलं अनाथ होतील असं म्हणत ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. ज्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत या आजोबांच्या कृतीला सलाम केला आहे.
“मैं 85 वर्ष का हो चुका हूँ, जीवन देख लिया है, लेकिन अगर उस स्त्री का पति मर गया तो बच्चे अनाथ हो जायेंगे, इसलिए मेरा कर्तव्य है कि मैं उस व्यक्ति के प्राण बचाऊं।'' ऐसा कह कर कोरोना पीडित @RSSorg के स्वयंसेवक श्री नारायण जी ने अपना बेड उस मरीज़ को दे दिया। pic.twitter.com/gxmmcGtBiE
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 27, 2021
त्यांनी स्वेच्छेने असा निर्णय घेत असल्याचे रुग्णालयाला लिहून दिले आणि त्यानंतर दाभाडकर यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र घर परतल्यानंतर तीनच दिवसात त्यांनी मृत्यूला कवटाळलं. नारायण दाभाडकरांच्या या कृतीचं नागपुरातच नव्हे तर सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Covid-19, Maharashtra News, Nagpur