Home /News /nagpur /

नाचण्याच्या वाद जीवाशी, चाकूनं भोसकून अल्पवयीन मुलाकडून 27 वर्षाच्या तरुणाचा खून

नाचण्याच्या वाद जीवाशी, चाकूनं भोसकून अल्पवयीन मुलाकडून 27 वर्षाच्या तरुणाचा खून

लग्नात डीजेवर (wedding DJ) नाचत असताना एका 27 वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. नागपुरात ही घटना घडली आहे.

नागपूर, 30 एप्रिल: नागपुरात एक धक्कादायक प्रकार (shocking incident) घडला आहे. लग्नात डीजेवर (wedding DJ) नाचत असताना एका 27 वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. धक्कादायक म्हणजे खून करणारा आरोपी हा (murder accused) अल्पवयीन आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लग्नात डीजेच्या तालावर नाचताना आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद झाला. या वादातून मृतक तरुणानं आरोपीला मारहाण केली. यानंतर रागात 12 वर्षीय आरोपीला चाकूनं भोसकून खून केला. नेमकी घटना काय? ही धक्कादायक घटना गुरुवारच्या रात्रीची आहे. हा खून नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये झाला आहे. राहुल गायकवाड असं मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी आणि मृत तरुण एकाच परिसरात राहणारे आहेत. डीजेवर नाचत असताना आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद झाला. त्यानंतर मृत राहुलनं आरोपीला मारहाण करण्यास सुरुवात केली. याचाच राग मनात ठेवून आरोपीनं जवळ असलेल्या चाकूनं राहुलच्या छातीवर वार केले. परीक्षेत पास करण्याचं आमिष, विद्यार्थिनीकडे प्राध्यापकाची धक्कादायक मागणी या घटनेनंतर राहुलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

तुमच्या शहरातून (नागपूर)

Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Nagpur, Nagpur News

पुढील बातम्या