Home /News /nagpur /

'राज्य सरकारला शेतकऱ्यांची नाही पण दारूवाल्यांची चिंता', सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर घणाघात

'राज्य सरकारला शेतकऱ्यांची नाही पण दारूवाल्यांची चिंता', सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर घणाघात

Sudhir Mungantiwar on MVA Government: भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विविध मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नागपूर, 23 जून: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात (Assembly session) यंदा दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. या मुद्द्यावरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर (Maharashtra Government) टीका केली आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मांडणार असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. चंद्रपुरातील दारूबंदी उठवल्याचा संदर्भ देत सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांची नाही पण दारूवाल्यांची चिंता आहे. दारूबंदी उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण शेतकऱ्यांच्या संबंधी निर्णय होत नाही आणि अधिवेशनाचा कालावधीही कमी केला आहे. शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ पुन्हा लांबणीवर; वाटपावरुन मविआ सरकारमध्ये मतभेद? राज्य सरकारमुळे ओबीसी आरक्षण गेले राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणांनी, सुप्रीम कोर्टात माहिती सादर न केल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षणा गेले. हे आघाडी सरकार डबल कुंभकर्ण आहे, 12 ही महिने हे झोपतात. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यास सरकार भूमिका घेत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. ओबीसी आरक्षण हा विषय पक्षाचा नाही तर सामाजिक न्यायचा आहे, भाजपचे मतदार नसेल तरी त्यांनी 26 जूनच्या आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 26 जूनला राज्यभर भाजपचे आंदोलन आहे. नागपूरमध्ये या आंदोलनाचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करणार आहेत. सुप्रीम कोर्टाने रद्द केलेल्या स्थानिक स्वराज संस्थेतील सर्व जागेवर भाजप ओबीसी उमेदवारांना उमेदवारी देणार आहे. भारतीय जनता पक्षाने तसा निर्णय घेतला आहे अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात दिली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Nagpur, Sudhir mungantiwar

पुढील बातम्या