Home /News /nagpur /

प्रेमविवाह करूनही नशिबी आला वनवास; नागपुरात आईने चिमुकल्याच्या डोळ्यादेखत संपवलं जीवन

प्रेमविवाह करूनही नशिबी आला वनवास; नागपुरात आईने चिमुकल्याच्या डोळ्यादेखत संपवलं जीवन

Suicide in Nagpur: नागपुरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेनं आपल्या तीन वर्षांच्या मुलाच्या डोळ्यादेखत गळफास घेऊन आत्महत्या (mother commits suicide in front of minor son) केली आहे.

    नागपूर, 29 डिसेंबर: नागपुरातील (Nagpur) संजय गांधीनगर परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेनं आपल्या तीन वर्षांच्या मुलाच्या डोळ्यादेखत गळफास घेऊन आत्महत्या (mother commits suicide in front of minor son) केली आहे. सोमवारी दुपारी घरी कुणीही नसताना, संबंधित महिलेनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती यशोधरानगर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मेघा सूरज कांबळे असं आत्महत्या केलेल्या 28 वर्षीय विवाहित महिलेचं नाव असून त्या नागपूर शहरातील संजय गांधी नगर परिसरात वास्तव्याला होत्या. मेघा यांनी सोमवारी दुपारी एकच्या सुमारास आपल्या माहेरच्या घरी गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघा यांचा संजय गांधीनगर परिसरातील सूरज याच्याशी प्रेमविवाह (Love marriage) झाला होता. गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्यात सुखी संसार होता. त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा देखील आहे. हेही वाचा-रंगीत स्वप्न दाखवून आयुष्य करायचे बेरंग; गरीब मुलींना परराज्यात घेऊन जायचे अन्.. दोघंही एकाच वस्तीत राहत होते. यातून त्यांची ओळख झाली. पुढे यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी प्रेमविवाह करण्याच निर्णय घेतला. पण घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. पण दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन एकमेकांशी विवाह केला. गेल्या सहा वर्षांपासून दोघांत सुखी संसार सुरू होता. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. सूरज पेंटिंगची कामे करतो. पण सूरजला दारूचं व्यसन असल्याने दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. हेही वाचा-10 वर्षांचा संसार क्षणात मोडला; प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेनं पतीचा घेतला जीव काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पुन्हा वाद झाला त्यामुळे मेघा आपल्या माहेरी आली. गेल्या दोन दिवसांपासून ती तणावात होती. सोमवारी दुपारी तिची आई काही कारणास्तव बाहेर गेली. यावेळी मेघा आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा दोघंच घरात होते. यावेळी मेघाने मुलाच्या डोळ्यादेखत घरातील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. काही वेळात मुलाचा रडण्याचा आवाज आल्याने तिची आई घरात गेली. तिला मेघा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. आईने आरडाओरड केली. शेजारी धावले. मेघाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur, Suicide

    पुढील बातम्या