Alert for Vidarbha: विदर्भात मान्सून दाखल; पुढील 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

Alert for Vidarbha: विदर्भात मान्सून दाखल; पुढील 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

Heavy Rain predicts in Vidarbha: महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सून दाखल होताच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याचं पहायला मिळत आहे.

  • Share this:

नागपूर, 9 जून: विदर्भात मान्सून (Monsoon in Vidarbha) दाखल झाला आहे. मान्सून दाखल होताच पुढील चार दिवस मुसळधार (Heavy rainfall) ते अतिमुसळधार पाऊस (Heavy to Heavy rainfall) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग हा ताशी 30-40 किमी प्रति तास इतका असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

विदर्भातील जिल्हावार हवामानाचा अंदाज

10 जून

नागपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना

वर्धा - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना

भंडारा - एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्या कडकटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

गोंदिया - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

11 जून

नागपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना

वर्धा - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना

भंडारा - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना

गोंदिया - एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

12 जून

नागपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, तसेच वादळीवारा (वेग 30-40 किमी प्रति तास) वाहण्याची शक्यता आहे.

वर्धा - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना

भंडारा - एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

गोंदिया - एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

13 जून

नागपूर - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना

वर्धा - एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना

भंडारा - एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

गोंदिया - एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

चंद्रपूर - एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

मुंबई-ठाण्यात रेड अलर्ट

मुंबई, ठाणे, रायगड परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. याच दरम्यान हवामान विभागाने मुंबई-ठाण्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.

रत्नागिरीत पाच दिवस ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Published by: Sunil Desale
First published: June 9, 2021, 5:17 PM IST
Tags: nagpurrain

ताज्या बातम्या