Home /News /nagpur /

नागपूरात महिला होमगार्डचा विनयभंग; पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई

नागपूरात महिला होमगार्डचा विनयभंग; पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई

Crime in Nagpur: एका महिला होमगार्डचा विनयभंग (female homeguard molestation) केल्याप्रकरणी नागपूरातील (Nagpur) एका पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

    नागपूर, 26 जून: एका महिला होमगार्डचा विनयभंग (Female homeguard molestation) केल्याप्रकरणी नागपूरातील (Nagpur) एका पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्यात होमगार्ड पदावर कार्यरत असणाऱ्या महिलेनं हे आरोप केले आहेत. याबाबतची तक्रार पोलीस आयुक्तांकडे देण्यात आली आहे. आयुक्तांनी विनयभंगाची तक्रार गांभीर्यानं घेतली असून संबंधित पोलीस निरीक्षकाचं निलंबन केलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अशोक मेश्राम (Ashok Meshram) असं संशयित आरोपी पोलीस निरीक्षकाचं नाव असून ते नागपूरमधील यशोधरा नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी पीडित होमगार्ड महिलेनं यशोधरा नगर पोलीस ठाण्यातच हा गुन्हा दाखल केला आहे. विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मेश्रामांवर निलंबनाची कारवाई केली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. ब्लॅकमेल करत महिला पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी मुंबईत एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर (Woman Police Officer) वारंवार लैंगिक अत्याचार (Blackmail and Sexual Harassment Case) केल्याची घटना समोर आली होती. आरोपीनं आपल्या दोन मित्रांच्या मदतीनं पीडितेला ब्लॅकमेल करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. यानंतर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं मेघवाडी पोलिसांत गुन्हा नोंदवला (FIR lodged) होता. हेही वाचा-लग्नानंतर 3 दिवसातच सासरकडच्यांकडून नवरीचा अमानुष छळ; गुप्तांगावर गरम सळईनं चटके पीडित महिला मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियावर एका खाजगी बँकेत अधिकारी पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची ओळख झाली होती. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर दोघांत मैत्री वाढत गेली. कालांतराने यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमसंबंधात झालं. हेही वाचा-शिक्षणासाठी मावशीकडे आली अन् घडलं विपरीत; मामा आणि काकानंच केले 7 महिने अत्याचार दरम्यान आरोपी प्रियकर एकेदिवशी पीडित महिलेला चकाला येथे भेटायला आला होता. याठिकणी आरोपीनं पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याला शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्यानं लैंगिक अत्याचार करतानाचा व्हिडीओही शूट केला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं अनेकदा पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur, Police

    पुढील बातम्या