अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांची फाशीची शिक्षा रद्द; नागपूर खंडपीठाचा निर्णय

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांची फाशीची शिक्षा रद्द; नागपूर खंडपीठाचा निर्णय

Minor Girl Gang Rape: घरात झोपलेल्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन नराधमांची फाशीची शिक्षा रद्द (Abolition of death penalty) करण्यात आली आहे.

  • Share this:

नागपूर, 08 सप्टेंबर: घरात झोपलेल्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Minor girl gang rape) करणाऱ्या दोन नराधमांची फाशीची शिक्षा रद्द (Abolition of death penalty) करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हा मोठा निर्णय दिला आहे. बुलडाणा सत्र न्यायालायानं नराधम आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेत कमी करत नागपूर खंडपीठानं दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment until death) सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

सागर विश्वनाथ बोरकर आणि निखिल शिवाजी गोलाईन अशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांची नावं आहेत. संबंधित दोघांनी 26 एप्रिल 2019 रोजी रात्री 10 च्या सुमारास एका 9 वर्षीय मुलीचं अपहरण केलं होतं. यावेळी पीडित मुलगी आपल्या घरात कुटुंबासोबत झोपली होती. पण नराधमांनी अत्यंत चलाखीनं पीडित मुलीचं तिच्या घरातून अपहरण केलं होतं. यानंतर नराधमांनी अमानुषतेचा कळस गाठत आळीपाळीनं पीडितेवर बलात्कार केला होता.

हेही वाचा-एकटीला पाहून रुममध्ये शिरला अन्...; IPS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत कुकचं विकृत कृत्य

या घटनेचा माहिती समोर येताच बुलडाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, संबंधित आरोपींनी बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळले होते. बुलडाणा सत्र न्यायालयात या घटनेची सुनावणी झाली असता, न्यायालयानं दोन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा-पुणे हादरलं! बहिणीसोबत केलेल्या विकृत कृत्याचा भावानं घेतला फिल्मी स्टाइल बदला

यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं संबंधित दोषींची फाशीची शिक्षा रद्द केली आहे. नागपूर खंडपीठानं आरोपींनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Published by: News18 Desk
First published: September 8, 2021, 11:17 AM IST

ताज्या बातम्या