मराठी बातम्या /बातम्या /nagpur /खर्रा घ्यायला गेला अन् परतलाच नाही; रेल्वेसमोर उडी घेत तरुणानं दिला जीव, गोंदियातील थरारक घटना

खर्रा घ्यायला गेला अन् परतलाच नाही; रेल्वेसमोर उडी घेत तरुणानं दिला जीव, गोंदियातील थरारक घटना

गोंदिया जिल्ह्यातील नवेगांव बांध याठिकाणी एका तरुणानं धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील नवेगांव बांध याठिकाणी एका तरुणानं धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे.

Suicide in Gondia: गोंदिया जिल्ह्यातील नवेगांव बांध याठिकाणी एका तरुणानं धावत्या रेल्वेसमोर उडी (Jump in front of a running train) घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.

गोंदिया, 08 ऑगस्ट: गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील नवेगांव बांध याठिकाणी एका तरुणानं धावत्या रेल्वेसमोर उडी (Jump in front of running train) घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर मृत तरुण खर्रा घेण्यासाठी जातो, म्हणून घराबाहेर पडला होता. पण रात्री बराच उशीर होऊनही तो परतला नाही. त्यानं धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आत्महत्येची माहिती समोर येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. नवेगाव बांध पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हितेश वालदे असं आत्महत्या करणाऱ्या 34 वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्यानं गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथील गोंदिया-बल्लरशहा लोहमार्गावर, धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. हितेशनं नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.

हेही वाचा-...अन् तिला वाचवण्यासाठी सख्ख्या भावांनी लावली जीवाची बाजी; तिघांचा बुडून मृत्यू

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी रात्री हितेशने कुटुंबीयासोबत रात्रीचं जेवण केलं. त्यानंतर घरच्यांना खर्रा घेण्यासाठी जात असल्याचं सांगत घराबाहेर पडला. पण रात्री साडेनऊच्या सुमारास हितेशनं मालगाडीच्या समोर उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली होती. यानंतर घटनास्थळी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसासह नवेगाव बांध पोलिसांना देण्यात आली.

हेही वाचा-वडिलांच्या उपचारासाठी मुलाचं गुन्हेगारी पाऊल; मंदिरात दानपेटीवर डल्ला मारला पण..

घटनेची माहिती मिळताच नवेगाव बांध पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, हितेशचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी हितेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हितेशनं आत्महत्या करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट लिहिली नाही. त्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. नवेगाव बांध पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Bhandara Gondiya, Crime news, Suicide