Nagpur Zilla Parishad Election 2021: 10 मिनिटात निकाल बदलला; भाजप नाही तर काँग्रेसच्या उमेदवार 10 मतांनी विजयी

Nagpur Zilla Parishad Election 2021: 10 मिनिटात निकाल बदलला; भाजप नाही तर काँग्रेसच्या उमेदवार 10 मतांनी विजयी

पुन्हा एकदा मतमोजणी केल्यानंतर काँग्रेसच्या सुलोचना ढोक 10 मतांनी विजयी समोर आलं. या निकालानंतर काँग्रेसनं एकच जल्लोष केला आहे.

  • Share this:

नागपूर, 06 ऑक्टोबर: नागपूरमध्ये निकालात बदल झाल्याची बातमी समोर येत आहे. भाजपच्या ममता जैस्वाल यांना विजयी घोषित केल्यानंतर निकाल बदलला असल्याचं वृत्त आलं आहे. दवलामोटी गणात जाहीर झालेल्या निकालात बदल झाला आहे. दवलामोटीमध्ये काँग्रेसच्या सुलोचना ढोक 10 मतांनी विजयी झाल्या आहेत.

भाजपच्या ममता जैस्वाल यांना विजयी घोषित करताच भाजपनं जल्लोष करण्यास सुरुवात केली. मात्र दोन्ही उमेदवारांना पुन्हा बोलावून मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा मतमोजणी केल्यानंतर काँग्रेसच्या सुलोचना ढोक 10 मतांनी विजयी समोर आलं. या निकालानंतर काँग्रेसनं एकच जल्लोष केला आहे.

या मतमोजणी झालेल्या गोंधळावर सुचोलना ढोक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपनं स्वतः विजयी असल्याचं जाहीर करुन जल्लोष करण्यास सुरुवात केल्याचं ढोक यांनी म्हटलं आहे.

जिल्हा-नागपूर

जिल्हा परिषद

भाजप-01

शिवसेना-00

राष्ट्रवादी-0

काँग्रेस-0 4 आघाडी )

शेकप - 01

इतर-00

जिल्हा-नागपूर

पंचायत समिती(सर्व जिल्ह्यातील मिळून)

भाजप-03

शिवसेना-00

राष्ट्रवादी-00

काँग्रेस-08

इतर-00

उमरेडमध्ये भाजपनं हिसकावली काँग्रेसची जागा, मीनाक्षी कावटे 113 मतांनी विजयी

भाजपनं नागपूरच्या उमरेडमध्येही विजयाचा झेंडा रोवला आहे. भाजपच्या मीनाक्षी मनोहर कावटे या 113 मतांनी विजयी झाल्या आहेत. मीनाक्षी कावटे यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला आहे. मकरधोकडा पंचायत समिती मतदारसंघात भाजपनं विजयी सलामीची नोंद केली आहे.

गेल्या वेळी ही जागा काँग्रेसकडे होती. भाजपने ही जागा काँग्रेसकडून हिसकावली (Maharashtra Zilla Parishad Election Result LIVE)  आहे. मीनाक्षी कावटे यांनी काँग्रेस उमेदवार शालू धनराज गिल्लुरकर यांचा पराभव केला आहे.

भाजपच्या मीनाक्षी मनोहर कावटे यांना 2042 मतं पडली. तर काँग्रेसच्या शालू गिल्लुरकर यांना 1929 मतं पडली आहेत.

तालुका - उमरेड

गण मकरधाेकडा (सर्वसाधारण - महिला)

विजयी उमेदवार मिळालेली मते

1. मीनाक्षी मनाेहर कावटे 2042 भाजपा (13 मतांनी विजयी)

2.  शालू धनराज गिल्लुरकर काॅंग्रेस 1929

3. कविता वसंता निकाेसे वंचित 1928

4.  पंचफुला किसना कुहीटे शिवसेना 677

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक

-नागपूर जिल्हा परिषद मध्ये 16 जिल्हा परिषद व 31 पंचायत समिती च्या जागेसाठी पोट निवडणूक

-नागपूर जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी चे आघाडी आहे तर भाजप व शिवसेना स्वतंत्र लढत आहे.

-नागपूर जिल्ह्यात काँग्रेस नेतृत्व दुग्ध व पशु संवर्धन मंत्री सुनील केदार करत आहे. भाजपचे नेतृत्व चंद्रशेखर बावनकुळे करत आहे तर शिवसेनेचे नेतृत्व खासदार कृपाल तुमाणे करत आहे.

First published: October 6, 2021, 11:49 AM IST

ताज्या बातम्या