मराठी बातम्या /बातम्या /nagpur /Maharashtra Weather update: मुसळधार पावसात वीज कोसळून तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Maharashtra Weather update: मुसळधार पावसात वीज कोसळून तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Lightning strike killed three person: मुसळधार पावसात अचानक वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे.

Lightning strike killed three person: मुसळधार पावसात अचानक वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे.

Lightning strike killed three person: मुसळधार पावसात अचानक वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे.

नागपूर, 6 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने (Rain) आज पुन्हा एकदा विदर्भात (Vidarbha) हजेरी लावली. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसात वीज कोसळून तिघांचा मृत्यू (3 killed in lightning strike) झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक (Ramtek Nagpur) येथे ही घटना घडली आहे. मृतकांमध्ये एक शेतकरी, गुराखी आणि एका पोलीस पाटलाचा समावेश आहे.

अचानक पावसाला सुरूवात झाल्याने शेतकरी, पोलीस पाटील, मजूर आणि गुराखी यांनी शेतातील एका झोपडीत आश्रय घेतला. त्याच दरम्यान जोरदार वीज कडाडली आणि जोपडीवर कोसळली. वीज कोसळल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रामटेक शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra Assembly Session: अन् विधानपरिषदेत रंगली भडंग, वडा आणि माश्यांची चर्चा...

मृतांमध्ये पोलीस पाटील, मजूर व गुराख्याचा समावेश आहे. तर जखमींमध्ये शेतकरी, 12 वर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना रामटेक तालुक्यातील चारखुमारी शिवारात दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. योगेश अशोक कोकणे, मधुकर सावजी पंधराम आणि दिलीप मंगल लांजेवार अशी मृतकांची नावे आहेत. तर हरिसिंग सरोते आणि नेहाल रामसिंग कुमरे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

हरिसिंग सरोते यांची गावाजवळच शेती असून त्यांनी पोलीस पाटील योशेश यांचा ट्रॅक्टर शेती कामासाठी भाड्याने घेतला होता. तर 12 वर्षीय नेहाल हा शेताजवळ त्यांच्या गाई चारत होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे सर्वांनी पावसापासून आसरा घेण्यासाठी झोपडीत प्रवेश केला होता.

First published:
top videos

    Tags: Nagpur, Rain