Home /News /nagpur /

Weather Alert! बंगालच्या उपसागरात पुन्हा नवं संकट; उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार

Weather Alert! बंगालच्या उपसागरात पुन्हा नवं संकट; उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार

Weather Alert: उद्यापासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर (Rain in Maharashtra) वाढण्याची शक्यता आहे.

    नागपूर, 15 ऑक्टोबर: नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थातच मान्सूनने काल महाराष्ट्राचा निरोप (Monsoon withdrawn in maharashtra) घेतला आहे. काल (गुरुवारी) उर्वरित मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातून मान्सून परतला असल्याचं भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केलं आहे. राज्यात यावर्षी 4 महिने 9 दिवस पाऊस कोसळला आहे. दोन दिवस आधी महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने यावर्षी एक दिवस आधीच महाराष्ट्रात काढता पाय घेतला आहे. दरम्यान गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. आजही राज्यात सर्वदूर पावसाचं लॉकडाऊन राहणार आहे. पण उद्यापासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर (Rain in Maharashtra) वाढण्याची शक्यता आहे. खरंतर, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या 48 तासांत ओडिशा राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून उद्या मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या दहा जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे. हेही वाचा-कोरोनाला रोखणारा फॉर्म्युला तयार; व्हायरस मानवी पेशीमध्ये एंट्रीच करू शकणार नाही संबंधित दहा जिल्ह्यात उद्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आकाशात विजा चमकत असता, घराबाहेर न पडण्याचा किंवा मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं न राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिला आहे. उद्या अनेक ठिकाणी आकाशात वीज चमकण्याची तीव्रत अधिक असेल, असे संकेत रडार यंत्रणेने दिले आहेत. हेही वाचा-संसर्ग घटला तरी भारतात या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; संशोधनात मोठा खुलासा उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी (17 ऑक्टोबर) कोकण, घाट परिसर आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यात वेगवान वाऱ्यांच्या साथीने मुसळधार पावसाची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Rain, Weather forecast

    पुढील बातम्या