मैदानात सराव करताना वीज कोसळली; दोघांचा जागीच मृत्यू, नागपुरातील घटना

मैदानात सराव करताना वीज कोसळली; दोघांचा जागीच मृत्यू, नागपुरातील घटना

lighting strikes in nagpur 2 youths died: नागपुरात तरुणांचा मैदानात सराव सुरू असताना वीज कोसळली. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नागपूर, 11 सप्टेंबर : गेल्या आठवड्याभरात राज्यातील विविध भागांत वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Heavy rainfall) पडत आहे. नागपुरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमाराच जोरदार वीजांचा कडकडाट झाला. वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू (Lightning strike killed 2 youths) झाला. नागपुरातील चनकापूर (Chankapur Nagpur) येथील मैदानात ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण नागपुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील चनकापूर येथे असलेल्या मैदानात नेहमीप्रमाणे तरुण क्रिकेट आणि फुटबॉलचा सराव करण्यासाठी येत असतात. शुक्रवारी सुद्धा अशाच प्रकारे सर्व मुले मैदानात सराव करत होते आणि त्याच दरम्यान वीज कोसळली. या दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तन्मय दहीकर आणि अनुज कुशवाह या दोघांवर वीज कोसळली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. तर सक्षम हा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अन् मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

गडचिरोलीत 110 शेळ्या दगावल्या

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात मसेली गावानजीक असलेल्या सावली येथील जंगलात वीज कोसळून शंभराहून अधिक शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडली. कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान, गुजरात येथून काही मेंढपाळ शेळ्या आणि मेंढ्या घेऊन येत असतात. यंदा हे मेंढपाळ दोन डेरे घालून वसलेले आहेत. त्यापैकी एक डेरा बेळगाव परिसरात, तर दुसरा डेरा सावली परिसरात आहे. दोन्ही डेऱ्यांमध्ये 7-8 परिवारांचा समावेश आहे. रात्रीच्या सुमारास सावली परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू लागला. अशातच अचानक डेऱ्याजवळच वीज कोसळल्याने जवळपास 110 शेळ्या आणि मेंढ्या जागीच ठार झाल्या. यामुळे मेंढपाळांचे सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Published by: Sunil Desale
First published: September 11, 2021, 7:59 AM IST
Tags: nagpurrain

ताज्या बातम्या