या बॅनरवर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे व सुधाकर कोहळे यांचे फोटो बॅनरवर लावून भाजप ने या ओबीसी नेत्यांसोबत काय केले हा प्रश्न उपस्थित केला. या नेत्यांच्या फोटोवर 'जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बांनी' असा मजकूरही लिहिला आहे. करण जोहरची भविष्यवाणी ठरली खोटी; पाहा रणवीर सिंग विषयी काय म्हणाला होता करण हे बॅनर पाहिल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. एका कार्यकर्त्याने पुलावर जाऊन हे बॅनर काढून टाकले. नंतर पोलिसांनी धाव घेऊन हे बॅनर जप्त केले. पण, घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात हे चक्काजाम आंदोलन होत आहे. यासाठी मोठया संख्येने भाजपचे कार्यकर्ते आंदोलन ठिकाणी जमले आहे. पंकजा मुंडे आंदोलनात सहभागी दरम्यान, पुण्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी चक्काजाम केल्यानंतर परळीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन सुरू आहे. चक्काजामला जाण्यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसीचे नेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. बीड जिल्ह्यात तब्बल 24 ठिकाणे चक्का जाम आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये तगडा पोलिस बंदोबस्त केला असून आंदोलनामध्ये अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. WTC Final मधील जखमेनंतर न्यूझीलंडचे मलम, भारतीय फॅन्सना दिली Good News चक्काजाम नंतर राज्य सरकारनेओबीसी अरक्षणा संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल असा इशारा खासदार प्रीतम मुंडे यांनी दिला आहे.#नागपूर : भाजपच्या बॅनरवर युवक काँग्रेसने लावले बॅनर, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे व सुधाकर कोहळे यांचे फोटो लावून भाजप ने या ओबीसी नेत्यांसोबत काय केले हा प्रश्न उपस्थित केला pic.twitter.com/6hG0GCYAxi
— News18Lokmat (@News18lokmat) June 26, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP