मराठी बातम्या /बातम्या /nagpur /काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर कार्यकर्त्याला पडला पक्षाचा विसर, दिल्या भाजप विजयाच्या घोषणा

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर कार्यकर्त्याला पडला पक्षाचा विसर, दिल्या भाजप विजयाच्या घोषणा

Confusion ही Confusion है! हा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Confusion ही Confusion है! हा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Confusion ही Confusion है! हा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुंबई, 10 जून : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले पक्ष संघटन वाढीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज खामगाव येथील एका ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र या दौऱ्यादरम्यान वेगळाच प्रकार समोर आला. कार्यकर्त्याने केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले देखील अचंबित झाले. (Congress state president Nana Patole)

असं असताना अचानक एका काँग्रेस कार्यकर्त्याने भारतीय जनता पार्टीचा जयघोष केल्याने नाना पटोले यांच्यासह सर्वच अचंबित झाले होते. या प्रकारानंतर काहीकाळ कार्यकर्त्यांमध्ये हसू पिकल्याचंही पाहायला मिळालं. हा नवीन कार्यकर्ता नुकताच भाजप सोडून काँग्रेसमध्ये आल्याने असा प्रकार घडला असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काँग्रेसचा राज्य़ातील आक्रमक चेहरा अशी नाना पटोले यांची ओळख आहे. भाजपातून काँग्रेसवासी झालेले नाना पटोले हे सध्या त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चांगलेच चर्चेत आहेत. ते सातत्याने मांडत असलेल्या भूमिकांमुळेच त्यांना फेब्रुवारीमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाल्याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बॅकफूटवर असलेल्या काँग्रेसला सरकारमध्ये आणि राज्यात नवसंजिवनी देण्याचा पटोले यांचा प्रयत्न आहे. येत्या महापालिका निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. आगामी काळात त्यांचा मंत्रिमंडळातही समावेश होऊ शकतो. अशा स्थितीत नाना पटोले यांच्या कार्यालयाबाहेर झालेल्या या घोषणाबाजीमागे वेगळे कटकारस्थान तर नाही ना, अशीही शंका उपस्थित करण्यात येते आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Congress, Nana Patole