Home /News /nagpur /

OBC आरक्षण मिळवून नाही दिलं तर राजकीय सन्यास घेईल, फडणवीसांचं मोठं विधान

OBC आरक्षण मिळवून नाही दिलं तर राजकीय सन्यास घेईल, फडणवीसांचं मोठं विधान

'ओबीसीचे आरक्षण घालवले हे राजकीय षडयंत्र आहे. राज्याचे नेते काही झाले तर नरेंद्र मोदींकडे बोट दाखवतात'

    नागपूर, 26 जून : 'आमच्या हाती सूत्र द्या, मी ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation)  परत आणून दाखवतो. जर असं करून दाखवलं नाही तर राजकीय संन्यास घेईल' अशी ग्वाहीच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. तसंच, 'ओबीसी आरक्षणाचे मारेकरी हे काँग्रेसच आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. नागपूरमध्ये (Nagpur) देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी व्हेरायटी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (BJP protest against obc reservation) 'या राज्य सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचे महत्व ताटातल्या चटणी, कोशिंबीर प्रमाणे आहे. मात्र हे मंत्री आपल्या राजकीय आकांच्या सांगण्यावरून तेच बोलतात. महाराष्ट्रात ज्या प्रकारे ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले त्यामुळे एक तर आरक्षण द्यावे लागेल नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल', असं फडणवीस म्हणाले. कांदिवली बनावट लसीकरण प्रकरण; बोगस लस पुरवणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला अटक 'ओबीसीचे आरक्षण घालवले हे राजकीय षडयंत्र आहे. राज्याचे नेते काही झाले तर नरेंद्र मोदींकडे बोट दाखवतात. उद्या यांच्या बायकोनी मारले तरी तेव्हा देखील हे मोदी यांच्याकडेच बोट दाखवतील', असा सणसणीत टोलाही लगावला. 'या आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेस आहे. काँग्रेस नेते या साठी आरक्षणात कोर्टात गेले होते. त्यामुळे आरक्षण गेले. आमच्या हाती सूत्र द्या मी ओबीसींचे आरक्षण परत आणून दाखवले नाही तर राजकीय संन्यास घेईल', असंही फडणवीस म्हणाले. तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधण्याची पतीची होती इच्छा; पत्नीनं गुप्तांग कापलं अन्... तसंच, '100 टक्के जे तुमच्या हाती आहे. ते तुम्हाला करायचं नाही. कारण तुमच्या मनामध्ये काही तरी काळंबेरं आहे. हे काळंबेरं ही नवीन थेअर करत आहे.  यांचे काही विचावंत आहे. काही चांगले आहे, तर काही बाजारू विचारवंत आहे. यांच्याकडून काही मत घेतात आणि बोलत असता ही मोदींनी डेटा द्या, अशी मागणी करतील. या मागणीमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्या मागे पडेल', अशी टीकाही फडणवीस यांनी केली. 'मराठा आरक्षणाच्या वेळी आम्ही चार महिन्यात डेटा तयार केला होता. आमच्याकडून शक्य आहे म्हणून मी बोलतोय. ओबीसी आरक्षण हा केंद्राचा विषय नाही, तर राज्य सरकारचा विषय आहे. राज्य सरकार कायदा करून ओबीसींना आरक्षणासाठी कायदा करू शकतात', असंही फडणवीस म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Nagpur

    पुढील बातम्या