Home /News /nagpur /

मध्य भारतात गारपिटीची शक्यता; विदर्भात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांना इशारा

मध्य भारतात गारपिटीची शक्यता; विदर्भात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांना इशारा

Weather Forecast Today: राज्यात काही ठिकाणी थंडीचा कहर सुरू असताना, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी विजांच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

    नागपूर, 15 जानेवारी: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात हवामानाची आंधळी कोशिंबीर सुरू आहे. देशात कुठे मेघर्जनेसह जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू आहे. तर काही ठिकाणी थंडीचा कहर सुरू आहे. आज पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि झारखंडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान (Weather) विभागाकडून वर्तवला आहे. खरंतर, पावसाळा ऋतू (Monsoon) संपून दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. असं असताना देखील महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेसह अवकाळी पावसाचा (Non seasonal rain) कहर सुरू आहे. मागील चोवीस तासात धुळ्यातील किमान तापमान 3 अंशांनी घसरलं असून याठिकाणी आज 7.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. एकीकडे थंडीचा कहर सुरू असताना, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा-राज्यात थंडीचा कहर, धुळ्यात तापमानाचा पारा 7 अंशावर, जाणून घ्या पुण्यातील हवामान हवामान खात्याने आज विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांतच याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल औरंगाबाद आणि अकोला जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळला आहे. याचा रब्बी पिकांना फटका बसत आहे. यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. हेही वाचा-तुम्ही बाजारातून विकत घेतलेला मास्क खरोखरच N95 आहे का? ओळखण्याची सोपी पद्धत दुसरीकडे, आज पुण्यात पाषाण याठिकाणी सर्वात कमी 11.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत पुण्यातील किमान तापमान किंचित वाढलं आहे. यासोबतच इंदापूर (12.5), माळीण (12.6), एनडीए (12.6), हवेली (12.7) आणि राजगुरूनगर याठिकाणी (12.8)  अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुण्यात इतर ठिकाणी किमान तापमानाचा पारा 13 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदला आहे. तर येत्या 4 ते 5 दिवसांत देशातील तामिळनाडू, पॉंडेचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather forecast

    पुढील बातम्या