Weather Update: विकेंडला विदर्भात मेघगर्जनेसह धुव्वाधार पाऊस; काय असेल पुणे-मुंबईची स्थिती?
Weather Update: विकेंडला विदर्भात मेघगर्जनेसह धुव्वाधार पाऊस; काय असेल पुणे-मुंबईची स्थिती?
Weather Update Today: पुढील तीन दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण विकेंडला विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार (Rain alert) पावसाची शक्यता आहे.
नागपूर, 13 ऑक्टोबर: ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनने जोरदार हजेरी (Heavy Rainfall in Maharashtra) लावली आहे. यानंतर आता मान्सूनने राज्यातून परतीचा प्रवास (Monsoon Withdrawn) सुरू केला आहे. संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून मान्सून माघारी परतला आहे. तसेच पुढील एक-दोन दिवसांत राज्यातून मान्सून पूर्णपणे परतणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण विकेंडला विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार (Rain alert) पावसाची शक्यता आहे.
शनिवारी 16 ऑक्टोबर रोजी राज्यातील 14 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 16 ऑक्टोबर रोजी नागपूरसह अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चौदा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत शनिवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे देखील वाहणार आहेत.
IMD च्या अंदाज प्रमाणे ह्या आठवड्याच्या अखेरीस, 16-17 ऑक्टोबर; विदर्भ आणि संलग्न मराठवाड्याचे भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
आज पण द कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. pic.twitter.com/ILnsr4b9kK
तर रविवारी कमी अधिक प्रमाणात राज्यात हवामाची स्थिती हीच कायम राहणार आहे. रविवारी हवामान खात्याने राज्यात नागपूरसह अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, लातूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात शनिवारी आणि रविवारी कोरड्या हवामानाची शक्यता आहे.
हेही वाचा-पुण्यातून आली चिंता वाढवणारी बातमी; कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळली नवी बुरशीकाय असेल पुणे-मुंबईचं हवामान?
गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईसह पुणे आणि घाट परिसरात जोरदार पाऊस कोसळला आहे. त्यानंतर आता कोकणासह घाट परिसर, मध्य महाराष्ट्र, मराठवड्यात पावसानं उसंत घेतली आहे. तसेच सध्या राज्यातून मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील पाचही दिवस मुंबईसह पुण्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. दरम्यान काही ठिकाणी हलका पाऊस कोसळू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.