मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

VIDEO: मुसळधार पावसाने नागपुरला झोडपलं; रस्त्यावर गुडघाभर पाणी

VIDEO: मुसळधार पावसाने नागपुरला झोडपलं; रस्त्यावर गुडघाभर पाणी

Heavy rain in Nagpur: नागपूर शहरात आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. तसेच अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याचं पहायला मिळालं.

नागपूर, 8 जुलै : गेल्या आठ-दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने नागपूर शहरात आज जोरदार हजेरी (Heavy rain in Nagpur City) लावली. सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले (Waterlogging at many areas). रस्त्यांवर चक्क गुडघाभर पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. तसेच सखल भागांत असलेल्या सोसायटी आणि घरांतही पावसाचे पाणी (Rain water enters in house) शिरले.

शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले साचले. रामदास पेठ, धरमपेठ, शंकर नगर, शिवाजी नगरसह अनेक भागातील पाणी साचल्याने दृश्य पाहायला मिळत आहे. रामेश्वरी, पारडी, भरतनगर, कळमना, प्रभाग क्रमांक 1 हुडको कॉलनी भागात अनेक घरात पाणी शिरल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शरले असून स्थानिक नगरसेवकांचे लक्षच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागपूर शहरातील रस्त्यांवर आणि नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने एकच तारांबळ उडाली. काही ठिकाणी रस्त्यांवर चक्क कमरे इतकं पाणी साचल्याचंही समोर आलं आहे. एकूणच या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी राजकीय पदाधिकाऱ्यांवर टीका केली आहे.

Weather Alert: पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे; कोकणाला ऑरेंज तर पुण्यात यलो अलर्ट

कोकणाला ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याने 8 ते 12 जुलै दरम्यान संपूर्ण राज्यभरात पाऊस बरसणार असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच दक्षिण कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार 10 जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 12 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

First published:

Tags: Nagpur, Rain