नागपूर, 23 ऑगस्ट : नागपूर विद्यापीठाच्या (Nagpur University ) रसायनशास्त्र विभागप्रमुख ( Department of Chemistry) डॉ. ज्योत्सना मेश्राम (Dr Jyotsna Meshram) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेश्राम यांनी इमारतीच्या नव्या माळ्यावरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ज्योत्सना मेश्राम या बेलतरोडी येथील फॉर्च्युन श्री अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. आज दुपारी त्यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीकडून मारहाण; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मेश्राम यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ज्योत्सना मेश्राम यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु, पतीच्या मृत्यूपासून त्या मानसिक तणावात असल्याचे सांगितलं जात आहे.
ज्योत्सना मेश्राम या माजी कुलगुरू दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या पत्नी होत्या. डॉ. सुधीर मेश्राम यांचं वयाच्या 66 व्या वर्षी मार्च महिन्यात निधन झाले होते. ज्योत्स्ना मेश्राम या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहत होत्या.
तीन महिन्यांनंतर उघडले जगन्नाथ मंदिराचे दरवाजे, पाहा PHOTOs
आज त्यांनीही आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात मुलगा सिद्धार्थ आणि मोठा आप्तपरिवार आहे. ज्योत्सना मेश्राम यांच्या आत्महत्येमुळे नागपूरच्या शिक्षण श्रेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.