Home /News /nagpur /

चंद्रपूर जिल्ह्यात आढळले विशालकाय डायनोसोरसदृश्य जीवाश्म

चंद्रपूर जिल्ह्यात आढळले विशालकाय डायनोसोरसदृश्य जीवाश्म

स्थानिक शेतकरी विजय ठेंगणे आणि त्यांची शाळकरी मुले नदी पात्रात फिरत असताना त्यांना हाड सदृश्य खडकं आढळली होती. परंतु ही हाडे किंवा दगड आहे किंवा काय हे त्यांना कळले नसल्याने त्यांनी चंद्रपूर तेथील भुशास्त्र संशोधक प्रा सुरेश चोपणे यांच्याशी संपर्क करून येथे संशोधन करण्याची गरज व्यक्त केली.

पुढे वाचा ...
चंद्रपूर, 2 डिसेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur News) वरोरा तालुक्यात 4 फुट लांब आणि 1 फुट रुंद पायाचे हाड, 3 फुट लांब बरगडीचे हाड आढळले असून त्यांचा आकार पाहता ते डायनोसोर या विशालकाय प्राण्याचे असल्याचे दिसले. परंतु तेथील भूस्तर पाहता हे 15-20 हजार वर्षापूर्वीच्यां दुर्मिळ हत्तींचे असावे असा अंदाज चंद्रपूर येथील भुशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या पश्चिमेला तुळाना गावाजवळून वर्धा नदी वाहते. नदीच्या पात्रात काही ठिकाणी मागील हिमयुगीन काळात महापुरात वाहत आलेला दगड-गाळाचा थर आहे. तर त्याच ठिकाणी बेसाल्ट खडकाचे थर आहेत. दोन्ही थरांची सळमिसळ झाल्याने काळाचा अंदाच घेणे कठीण होते. स्थानिक शेतकरी विजय ठेंगणे आणि त्यांची शाळकरी मुले नदी पात्रात फिरत असताना त्यांना हाड सदृश्य खडकं आढळली होती. परंतु ही हाडे किंवा दगड आहे किंवा काय हे त्यांना कळले नसल्याने त्यांनी चंद्रपूर तेथील भुशास्त्र संशोधक प्रा सुरेश चोपणे यांच्याशी संपर्क करून येथे संशोधन करण्याची गरज व्यक्त केली. 29 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी जीवाश्म स्थळी भेट देऊन निरीक्षणे केली असता ती हाडे हे जीवाश्म असून डायनोसोर किंवा हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याची असावी असा अंदाज व्यक्त केला. यातीलल मोठे जीवाश्म हे 4 फुट लांब मांडीचे हाड आहे आणि जवळच छातीच्या बरगडीचे 3 फुट लांब हाड आढळले. हाडाच्या आकारावरून हा प्राणी 15 फुट उंच आणि आणि 20 फुट लांब असावा. यावरून हा जीव एकतर डायनोसोर किंवा विशाल आकाराचा हत्ती असला पाहिजे. इथे गेल्या काही वर्षापासून रेती उत्खननाचे काम सुरु असल्याने काही हाडे पाण्यात फेकली असल्याचे गावकऱ्याचे मत आहे. हे जीवाश्म अगदी नाजूक आणि कच्चे असल्यामुळे ते काही १५-२०  हजार वर्षादरम्यानाचे असावे असा अंदाज व्यक्त केला. हे ही वाचा-Goat Milk : कोरोनापासून बचाव करू शकतं शेळीचं दूध? काय सांगतात तज्ज्ञ पाहा आकारावरून ते विशालकाय डायनोसोरचे असल्याचे वाटते. परंतु ज्या गाळात ते आढळतात आणि जितके ते जीवाश्म नाजूक आहे त्यावरून आणि त्यांना अलीकडे याच नदीत सापडलेल्या हत्तीच्या दातांचे पुरावे यावरून ते हत्तीचे असावे असा अंदाज प्रा सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला. त्यांनी भुशास्त्र विभागाला याबाबत कळविले असून त्यांच्या सर्वेक्षण आणि प्रयोगशाळेतील तपासणी नंतरच ते जीवाश्म नेमक्या कोणत्या प्राण्याचे आहे आणि काळ कोणता आहे ते कळेल. चंद्रपूर जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्‍या ‘भौगोलिक संग्रहालय’ असे म्हटल्या जाते. येथील बहुतेक तालुक्यात जीवाश्मे आढळली आहेत. यातील सर्व जीवाश्मांचे नमुने विद्यार्थी आणि संशोधकांसाठी सुरेश चोपणे यांच्या संग्रहालयात उपलब्ध आहेत. वरोरा तालुक्यात यापूर्वीही डायनोसोरची जीवाश्मे सापडली होती आणि अधून मधून खोदकामात अशी जीवाश्मे आढळत असतात. जीओलोंजीकल सर्वे ऑफ इंडिआ तर्फे त्वरित सर्वे आणि संशोधन करून येथील भूतकाळातील सजीवांची माहिती घ्यावी. नागरीकांनी सुद्धा अश्या प्रकारची खडक सापडल्यास संबंधित अभ्यासकास आणि भुशास्त्र विभागास माहिती द्यावी आणि त्यांचे संरक्षण करावे असे आवाहन जीवाश्म संशोधक सुरेश चोपणे यांनी केले आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Chandrapur

पुढील बातम्या