Home /News /nagpur /

बिबट्याच्या कातडीची तस्करी; तब्बल 12 जणांच्या आवळल्या मुसक्या, पंजे नखासहित सुळे जप्त

बिबट्याच्या कातडीची तस्करी; तब्बल 12 जणांच्या आवळल्या मुसक्या, पंजे नखासहित सुळे जप्त

बिबट्याच्या कातडीची (leopard skins) तस्करी (smuggled) करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात यश आलं आहे.

नागपूर, 06 डिसेंबर: बिबट्याच्या कातडीची (leopard skins) तस्करी (smuggled) करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात यश आलं आहे. तब्बल 12 जणांना अटक करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात (Gondia district) ही कारवाई करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा वनसंपदेने नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा वावर असतो. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांची हत्या झाल्याचं समोर आलं. अशातच गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे वन्यजीव बिबट्याची कातडी आणि अवयव यांची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार ही कारवाई केली गेली. या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागीय वन अधिकारी ( दक्षता ) नागपूर आणि गोंदिया वन विभाग द्वारा सालेकसा तहसील कार्यालयाच्या पटांगणाजवळ सापळा रचून वन्यजीव बिबट्याच्या अवयवाची विक्री करण्याऱ्या 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांकडून बिबट्याची कातडी 1 नग, पंजे नखासहित 4 नग, बिबट सुळे दात तुटलेले 2 नग आणि इतर 13 नग, बिबट मिश्या 10 नग आणि 3 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व आरोपींची रवानगी वनकोठडीत केली असून न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Nagpur

पुढील बातम्या