मराठी बातम्या /बातम्या /nagpur /गडचिरोलीत सी-60 जवानांची मोठी कारवाई; दोन माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोलीत सी-60 जवानांची मोठी कारवाई; दोन माओवाद्यांना कंठस्नान

सतर्क असलेल्या जवानांनी माओवाद्यांचा हल्ला परतवून लावला.

सतर्क असलेल्या जवानांनी माओवाद्यांचा हल्ला परतवून लावला.

सतर्क असलेल्या जवानांनी माओवाद्यांचा हल्ला परतवून लावला.

गडचिरोली, 28 एप्रिल: गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli district) गेल्या आठ दिवसांपासून जांबिया गटाच्या जंगलात (Jambia Gatta forest) सी सिक्स्टी (C-60) कमांडो पथकाकडून राबविण्यात येणाऱ्या अभियानाला यश प्राप्त झाले आहे. आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांच्या जवानांना यश मिळाले आहे. माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या घनदाट जंगलात घुसून केलेल्या कारवाईनंतर येणाऱ्या काळात छत्तीसगडचा सीमावर्ती भागात आक्रमक अभियान राबवण्याचे संकेत गडचिरोली पोलिसांनी आजच्या चकमकीनंतर दिले आहेत. दरम्यान मृतक माओवाद्यांचे मृतदेह आज दुपारी गडचिरोलीला आणण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून माओवाद्याच्या हिंसक कारवाया सुरू आहेत. माओवाद्यांच्या सर्वाधिक कारवाया एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात आहेत. एटापल्ली तालुक्यात जांबिया गट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारा परिसर हा अतिसंवेदनशील आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे त्यामुळे माओवाद्यांच्या नेहमीच या भागात सक्रिय हालचाली सुरू असतात. या भागात जांबीया गट्टा पोलीस ठाण्यावर गेल्या आठ दिवसांपूर्वी माओवाद्यांनी मध्यरात्री गोळीबार केला होता त्यासोबतच माओवाद्यानी एक ग्रेनेड फेकला होता मात्र सतर्क असलेल्या जवानांनी माओवाद्यांचा हल्ला परतवून लावला. जवानांच्या गोळीबारानंतर माओवादी पळून गेले होते बऱ्याच दिवसानंतर माओवाद्यांनी एका पोलीस ठाण्याला लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता या घटनेनंतर गडचिरोली पोलिसांनी महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात मोठा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला.

वाचा: राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला!

गडचिरोली परिक्षेत्राचे डीआयजी  संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वात माओवादविरोधी  विरोधी अभियानाचे अतिरिक्त अधीक्षक मनिष कलवानिया यांनी सी सिक्स्टी या कमांडो पथकांच्या तुकड्या या भागात रवाना केल्या होत्या गेल्या आठ दिवसांपासून या कमांडो जवानांचे याभागात अभियान सुरू आहे. अत्यंत घनदाट जंगल कुठलीही संपर्क यंत्रणा नाही अशा भागात जवान दिवस-रात्र अभियान राबवीत होते. आज सकाळी या भागात पोलीस ठाण्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात माओवाद्यासोबत चकमक झाली एक तासाच्या चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात कमांडो जवानांना यश मिळाले आहे.

घटनास्थळी दोन पुरुष माओवाद्यांचे मृतदेह आढळले असून काही शस्त्रही सापडली आहेत त्यानंतर या भागात शोध मोहीम राबवण्यात आली दुपारी हेलिकॉप्टरने हे मृतदेह गडचिरोली काढण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्राथमिकदृष्ट्या मिळालेल्या माहितीप्रमाणे दोघेही माओवाद्यांच्या ॲक्शन टीमचे सदस्य आहेत माओवाद्यांकडून पोलीस ठाण्यावर जो गोळीबार झाला होता त्यामध्ये यातील मृतक माओवाद्यांची भूमिका महत्त्वाची असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे उल्लेखनीय म्हणजे दंडकारण्यात माओवाद्यांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असताना गडचिरोलीत हे यश मिळाले आहे. बस्तरमध्ये माओवाद्यांच्या कारवाया वाढलेले असताना गडचिरोली पोलीस मात्र या ठिकाणी महाराजांचे विरोधात यशस्वी अभियान राबवित आहेत. आजची कारवाई येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात आक्रमक अभियान राबविण्याचा संकेत असल्याचे मानले जात आहे.

First published:

Tags: Maharashtra