भाजपला मोठा धक्का! नगरसेवकांच्या तक्रारीनंतर नगराध्यक्षांना अपात्र केलं घोषित

भाजपला मोठा धक्का! नगरसेवकांच्या तक्रारीनंतर नगराध्यक्षांना अपात्र केलं घोषित

शिवाय त्यांना सहा वर्षापर्यंत निवडणूक लढण्यासही मनाई केली आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या तक्रारीवरुन भाजपच्या नगराध्यक्षा अपात्र झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

गडचिरोली, 29 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाच्या (BJP Leader) नेत्या आणि गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे (Gadchiroli Municipal Council President Yogita Pramod Pipre) यांना नगर विकास मंत्रालयाने अपात्र घोषित केले आहे. शिवाय त्यांना सहा वर्षापर्यंत निवडणूक लढण्यासही मनाई (banned from contesting elections for six years) केली आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या तक्रारीवरुन भाजपच्या नगराध्यक्षा अपात्र झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

डिसेंबर २०१६ मध्ये गडचिरोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळी भाजपच्या योगिता पिपरे थेट जनतेतून निवडून येऊन नगराध्यक्ष झाल्या. शिवाय सर्वाधिक नगरसेवकही भाजपचेच विजयी झाल्याने नगर परिषदेत या पक्षाची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली. परंतु हळूहळू नगराध्यक्ष आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये विविध कारणांवरुन वितुष्ट निर्माण झाले. शेवटी 22 मे 2020 रोजी नगर परिषदेचे भाजपचेच तत्कालिन बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार व अन्य 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुन नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली.

हे ही वाचा-'कोरोना आजार हा मानवनिर्मित असून तो भारतात आणला गेला' - नाना पटोले

नगराध्यक्ष पिपरे या आपल्या पदाचा गैरवापर करुन बेकायदेशिररित्या अनेक ठराव मंजूर करवून घेत आहेत. शिवाय त्यांनी भाड्याचे वाहन वापरुन 11 लाख 61 हजार 514 रुपयांची उचल केली आहे. हे नियमबाह्य असल्याने पिपरे यांना अपात्र घोषित करावे, असे तक्रारकर्त्या नगरसेवकांचे म्हणणे होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयीचा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयाकडे पाठवला होता. त्याअनुषंगाने नगर विकास मंत्रालयाने नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करण्याचा निर्णय घेतला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीचा आदेश आज जिल्हाधिकारी कार्यालयात थडकला.

नोव्हेंबर अखेर विद्यमान सत्ताधाऱ्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे डिसेंबर वा जानेवारीमध्ये नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने मागील महिन्यात राज्य निवडणूक आयोगाने वॉर्ड फेररचनेचे काम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, नगराध्यक्षांना अपात्र घोषित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 29, 2021, 10:09 PM IST

ताज्या बातम्या