नागपूर, 07 जुलै: मागील दीड वर्षापासून जगभर कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. याचा सर्वात जास्त परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. पर्याय म्हणून अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडे कमी वयात मोबाइल फोन उपलब्ध झाला आहे. अशातच ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांकडून मोबाइल घेऊन त्यावर ऑनलाइन गेम खेळणं एका अल्पवयीन विद्यार्थिनीला चांगलंच महागात पडलं आहे. ऑनलाइन गेम खेळताना झालेल्या ओळखीतून आरोपीनं पीडित मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
संबंधित पीडित विद्यार्थिनी आठवीच्या वर्गात शिकत आहे. मागील काही काळापासून तिला ‘फ्री फायर गेम’ (free fire game) चा छंद लागला होता. ही गेम खेळण्यासाठी कोणत्याही एका पार्टनरची आवश्यकता असते. यासाठी तिने रोहित राजपूत ऊर्फ बॅड शहजाद नावाच्या युवकाला पार्टनर म्हणून घेतलं. यातून दोघांची चांगली ओळख झाली. Whatsapp नंबरची देवाण-घेवाण देखील झाली. यानंतर आरोपीनं तिचा विश्वास संपादन करून मैत्री वाढवली. प्रेमाच्या जाळ्यात ओढून आरोपीनं तिला न्यूड फोटोची आणि व्हिडीओ पाठवण्यास भाग पाडलं.
हेही वाचा-उद्योगपती गुपचूप करत होता दुसरं लग्न, मांडवात पहिली पत्नी आली आणि...
दरम्यान दोघं मागील काही दिवसांपासून हा गेम खेळतंच होते. पण गेम हरल्यानंतर पीडितेनं आरोपीला 2200 रुपये देणं आवश्यक होतं. पण तिच्याकडे पैशे नसल्यानं ती आरोपीला पैसे देऊ शकली नाही. पण आरोपीनं पैशांसाठी तिच्याकडे तगादा लावला. यानंतर पीडितेनं पैसे देण्यास थेट नकार दिला. यानंतर आरोपीनं पैशाच्या बदल्यात अश्लील व्हिडीओ पाठवण्यास सांगितले. पण पीडितेनं नकार दिला. त्यामुळे आरोपीनं जुने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेनं आरोपीला व्हिडीओ पाठवला. त्याचबरोबर पैसे नसल्यानं मुलीनं आरोपीला ब्लॉक केलं.
हेही वाचा-13 वर्षीय मुलीनं बाळाला दिला जन्म; वर्गमित्रानं ब्लॅकमेल करत केला होता बलात्कार
यामुळे चिडलेल्या आरोपीनं पीडितेचे अश्लील फोटो सोशल मीडियात व्हायरल केले. हे प्रकरण उघडकीस येताचं पीडितेच्या आईनं हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित राजपूत ऊर्फ बॅड शहजाद असं आरोपी युवकाचं नाव आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपीचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nagpur