कुठे आहेत अनिल देशमुख? दिल्ली दौऱ्यानंतर अनिल देशमुख अंडरग्राऊंड?, देखमुख कुठे आहेत कोणाला माहिती नाही

कुठे आहेत अनिल देशमुख?  दिल्ली दौऱ्यानंतर अनिल देशमुख अंडरग्राऊंड?, देखमुख कुठे आहेत कोणाला माहिती नाही

Anil Deshmukh Underground: चार तासाच्या चौकशी मध्ये ईडीच्या पथकाने जुन्या कागदपत्राची पाहणी केली सोबत अनिल देशमुख (NCP leader) यांच्या कुटूंबियांची इतर संपत्तीची नोकरांकडून विचारपूस केली.

  • Share this:

नागपूर, 19 जुलै: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra home minister Anil Deshmukh) यांच्या नागपुरातील (Nagpur) मधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने (ED Raid) छापा टाकला आहे. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Directorate) छापेमारी सुरु केली होती. चार तासाच्या चौकशी मध्ये ईडीच्या पथकाने जुन्या कागदपत्राची पाहणी केली सोबत अनिल देशमुख (NCP leader) यांच्या कुटूंबियांची इतर संपत्तीची नोकरांकडून विचारपूस केली. दरम्यान अनिल देशमुख कुठे आहेत हे कोणालाच माहित नाही.

अनिल देशमुख यांना ईडीने समन्स (summons) दिल्यापासून ते ईडी कार्यालयात पोहचले नाही. दिल्लीच्या दौऱ्यानंतर मागच्या 15 दिवसांपासून अनिल देखमुख कुठे आहे याबद्दल कोणाला माहिती नाही.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरही संपर्क होऊ शकला नाही आहे. रविवारी छापेमारी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर आणि आजूबाजूच्या अनेक ठिकाणी अनिल देशमुखांचा शोध घेण्यााचा प्रयत्न केला. पण त्यांचा ठावठिकाणा कुठे लागला नाही. त्यामुळे अनिल देशमुख लपून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मोठी बातमी: लवकरच अमित ठाकरेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी?

अनिल देशमुखांची संपत्ती जप्त

दोन दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने (ED) जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (money laundering) ईडीने ही कारवाई केली. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केलीय. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या. अखेर या प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला.

Published by: Pooja Vichare
First published: July 19, 2021, 9:26 AM IST

ताज्या बातम्या