...म्हणून नगरसेविकेनं तरुणाला दिली भयंकर शिक्षा; होम थिएटरचा आवाज वाढवून बेदम मारहाण, नागपुरातील घटना

...म्हणून नगरसेविकेनं तरुणाला दिली भयंकर शिक्षा; होम थिएटरचा आवाज वाढवून बेदम मारहाण, नागपुरातील घटना

नागपुरातील दत्तवाडीतील शिवशक्ती नगरमधील माजी महिला नगरसेविकेनं (Former female corporator) आणि तिच्या पतीनं एका तरुणाला बेदम मारहाण (Young man beating) केली.

  • Share this:

नागपूर, 14 सप्टेंबर: नागपुरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तवाडी याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. दत्तवाडीतील शिवशक्ती नगरमधील माजी महिला नगरसेविकेनं (Former female corporator) आणि तिच्या पतीनं एका तरुणाला बेदम मारहाण (Young man beating) केली. मारहाण केल्याचा आवाज शेजारील लोकांना जाऊ नये, म्हणून आरोपींनी घरातील साऊंड सिस्टीमचा आवाज वाढवून (Raising volume of sound system) पीडित तरुणाला मारहाण केली आहे. या घटनेत पीडित तरुणानं कसाबसा आपला जीव वाचवून घरातून पळ काढल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी नागपुरातील वाडी पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) झाला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

करण डोर्ले असं मारहाण झालेल्या 17 वर्षीय तरुणाचं नाव असून तो नागपुरातील शिवशक्ती नगरमधील रहिवासी आहे. त्याचे वडील CRPF चे जवान असून सध्या आपल्या कर्तव्यावर आहेत. दरम्यान, शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी करण सकाळी साढेसात ते 8 च्या सुमारास दुकानात ब्रेड आणण्यासाठी गेला होता. त्याचवेळी आरोपी नगरसेविका सरिता यादव यांच्या मोठ्या मुलीनं करणाला घरी बोलवलं.

उपचारासाठी गेलेल्या महिलेचा डॉक्टरने केला विनयभंग, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

काहीतरी काम असेल असं समजून करणही घरात गेला. पण करण घरात जाताच संबंधित मुलीनं घराचा दरवाजा बंद करत आपल्या आई वडिलांना बोलवलं. यानंतर अल्पवयीन मुलीला बोलतो, या कारणातून यादव कुटुंबान करणला बेदम मारहाण केली आहे. घरात करणला मारल्याचा आवाज शेजारच्यांना ऐकू जाऊ नये म्हणून आरोपींनी घरातील होम थिएटरचा आवाज वाढवून ही मारहाण केली आहे.

करणनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी नगरसेविका सरिता यादव, तिचा नवरा आणि तिची मोठी मुलगी यांच्यासह अन्य तीन युवकांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. अन्य तिघांनी तोंडाला स्कार्फ गुंडाळल्यानं पीडित तरुणाला त्यांची ओळख पटवता आली नाही. ही मारहाण इतकी भयंकर होती की करणच्या शरीरावर अनेक ठिकाणी जबरी जखमा झाल्या आहेत. त्याला गळ्यावर, पाठीवर, पायांवर लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यानं मारहाण करण्यात आली आहे. आरोपींनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशानं घरात बोलवलं होतं. आरोपीची मोठी मुलगी चाकू घेऊन येईपर्यंत करणने घरातून पळ काढला. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.

खासदाराकडून पार्टीतील महिलेवर बलात्कार; 3 महिन्यांनी गुन्हा दाखल

आरोपी नगरसेविकेच्या अल्पवयीन मुलीसोबत करण फोनवर बोलतो म्हणून त्याला ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान तुमची मुलगीच माझ्याशी बोलते, असं सांगून करण आरोपींना मोबाईलमधील पुरावा दाखवला असता, आरोपींनी त्याचा फोनही तोडून टाकला आहे. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: September 14, 2021, 2:01 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या